शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

जिल्ह्यात दोन आमदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 10:52 PM

जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.

ठळक मुद्देराजकीय उपलब्धी : नेरमध्ये शिवसेना, पांढरकवडात ‘प्रहार’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जानेवारी ते डिसेंबर २०१८ या वर्षभरात जिल्ह्याच्या राजकीय तिजोरीत मोठी भर पडली. काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा आणि भाजपाचे अ‍ॅड. निलय नाईक यांच्या रुपाने दोन विधान परिषद सदस्य जिल्ह्याला लाभले. त्यातही हे दोघेही पुसदचे असल्याने पुन्हा एकदा पुसदचे पारडे जड झाले.जिल्ह्यात विधानसभा व विधान परिषदेच्या एकूण आमदारांची संख्या ११ (सात-चार) झाली आहे. नागपूर नंतर विदर्भातील हा सर्वात मोठा आकडा आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना मात्र आपली आमदारकी गमवावी लागली. या वर्षातच काँग्रेस व राष्ट्रवादीला नवे जिल्हाध्यक्षही मिळाले. राष्ट्रवादीने आमदार ख्वाजा बेग यांच्यावर तर काँग्रेसने आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदासाठी विश्वास दाखविला. या विश्वासाचा ते आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षासाठी नेमका किती फायदा करून घेतात, हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. कारण आगामी निवडणुका त्यांच्याच नेतृत्वात लढल्या जाणार आहेत. संध्याताई सव्वालाखे यांच्या रुपाने काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीमध्ये स्थान मिळाले आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने २०१८ हे वर्ष तयारीचे वर्ष ठरले आहे. या वर्षात सर्वच पक्षांनी राजकीय बांधणी व संघटनात्मक तडजोडींकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसते. या तयारीवरच राजकीय पक्ष २०१९ मध्ये निवडणुकांना सामोरे जाणार आहे. त्यातील निकालानंतरच कुणाची तयारी किती दमदार होती, हे स्पष्ट होईल.गेल्या वर्षभरात जिल्ह्यात नेर व पांढरकवडा नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या. नेरमध्ये शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली. मात्र त्यांचे गतवेळपेक्षा दोन जागांचे नुकसान झाले. तेथे काँग्रेस-राष्ट्रवादी दोन जागांनी प्लस झाली. पांढरकवडा नगरपरिषदेत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षासह सत्तेसाठीचे बहुमत प्राप्त केले. या निकालाने प्रहारची आता आगामी निवडणुकांमध्येही अन्य राजकीय पक्षांकडून दखल घेतली जाणार आहे. प्रहारकडे उमेदवारीसाठीचा तिसरा पर्याय म्हणून पाहिले जात आहे. प्रहारनेही जिल्ह्यात विधानसभेच्या वणी, आर्णी, यवतमाळ व राळेगाव या चार जागांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षभरात शिवसेना नेते संजय राठोड व भावना गवळी यांच्यातील पक्षांतर्गत भांडणे आणखी मोठ्या प्रमाणात उफाळून पुढे आली. यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिक विभागला गेला. दोघांनी पुन्हा एकत्र यावे ही निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा असली तरी नेत्यांचा त्याला प्रतिसाद नाही. या भांडणांचा परिणाम आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पहायला मिळण्याची चिन्हे आहेत. दोन्ही नेते व त्यांचे समर्थक एकमेकांचा हिशेब चुकता करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भांडणात पक्षाचे राजकीय नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुखांच्या उपस्थितीत समाज बांधवांचे केलेले शक्तीप्रदर्शन हा राजकीय हिशेबाच्याच तयारीचा एक भाग मानला जातो. यावर्षात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाचे पहिल्यांदाच ‘त्रिभाजन’ही शिवसैनिकांना पहायला मिळाले.यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघावर आघाडीत काँग्रेसचा दावा असताना राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आपला दावा सांगून आघाडीत जोरदार खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादीचे संख्याबळ व पक्षबांधणीत फारसे अस्तित्व या मतदारसंघात नसताना केलेला हा दावा म्हणजे विधानसभेसाठी दबावाच्या खेळीचा भाग मानला जातो.काँग्रेसने या लोकसभा मतदारसंघात माणिकराव ठाकरेंना ‘तयारीला लागा’ असा आदेश दिल्लीतून दिल्याचे सांगितले जात असले तरी गत उमेदवार व अन्य नवीन चेहऱ्यांनीही अद्याप आशा सोडलेली नाही. उलट स्पर्धकांनी एकत्र येऊन उमेदवारीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करीत माणिकरावांपुढे आत्ताच आव्हान उभे केले आहे.जिल्ह्यात सात पैकी पाच जागा भाजपाकडे आहेत. त्यातील तिकीट वाटपात कुणाला डच्चू तर बसणार नाही ना? अशी हूरहूर कार्यकर्त्यांमध्ये पहायला मिळते. ‘सिटींग-गेटींग’चा निकष पाहता डच्चू देणे तेवढे सोपे नाही. तरीही सार्वजनिक व वैयक्तिक जीवनातील सर्वांच्या दृष्टीस पडणारी ‘वादग्रस्तता’ व त्यामुळे निवडून येण्याची कमी झालेली क्षमता पाहता एकाला डच्चू मिळण्याची शक्यता भाजपाच्या गोटात वर्तविली जात आहे.जिल्हा परिषद अस्थिर, नगरपालिकेत गोंधळगेली वर्षभर जिल्हा परिषदेतील काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपाच्या सत्तेची अस्थिरता पहायला मिळाली. निवडणुका तोंडावर आल्यानेच काँग्रेसने भाजपाशी युती तोडावी यासाठी मुंबईतून स्थानिक नेत्यांवर दबाव होता. मात्र अध्यक्षांच्या ‘गॉडफादर’ने हा दबाव झुगारुन युती कायम ठेवली. यवतमाळ नगरपरिषदेमध्ये सेना व भाजपातील अधिकाराचा गोंधळ वर्षभर कायम राहिला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा