शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

नेर शहरातील पाझर तलावात दोन शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

By सुरेंद्र राऊत | Published: January 08, 2023 8:48 PM

शवविच्छेदनाच्या भीतीने गोपनियता : पोलिसांकडे तक्रार नाही

नेर (यवतमाळ) : शहरात रविवारी दुपारी गंभीर घटना घडली. येथील वली साहेबनगर परिसरातील सहा मित्र पोहण्यासाठी दारव्हा मार्गावरील पाझर तलावाकडे गेले. हरण टेकडीजवळ असलेल्या या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पोहत असताना दोघेजण या गाळात फसले. यातच त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही माहिती इतर चौघांनी कुटुंबियांना दिली. त्यानंतर तत्काळ त्या दोन मुलांचे मृतदेह परस्परच तलावाबाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत प्रचंड गोपनियता ठेवण्यात आली. इतकेच काय घटनेचे वृत्तसुद्धा दिले जाऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. या गंभीर घटनेने नेर शहरात खळबळ उडाली असून, विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

सहा मित्र रविवारी घरून बाहेर पडले. त्यांनी उर्दू स्कूलमध्ये स्नेहमिलन बघितले. नंतर ते पोहण्यासाठी पाझर तलावाकडे पोहोचले. तेथे पोहत असताना दुपारी १:३०च्या सुमारास दोघेजण बुडाले. या तलावात ब्लास्टिंग केल्याने मोठमोठे खड्डे आहेत. त्यात गाळ साचला आहे. या गाळातच पोहताना ते दोघेजण फसले असावेत, असा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेनंतर घाबरलेल्या अन्य चाैघांनी थेट घराकडे धूम ठोकली.

त्यांनी दोघेजण बुडाल्याची माहिती कुटुंबियांना दिली. यातील एक १६ वर्षांचा तर एक १८ वर्षांचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मृतांचे नाव समजू नये, यासाठी प्रचंड गोपनियता बाळगण्यात आली. पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती मिळाल्यास मृतांची शवचिकित्सा केली जाईल, या भीतीतून घटनेची माहिती लपविण्यात आली. त्यामुळेच मृत विद्यार्थ्यांची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. ही घटना घडल्यानंतर तत्काळ मृतदेह बाहेर काढून सायंकाळी त्यांच्यावर दफनविधी करण्याच्या हालचाली सुरू होत्या. एवढी मोठी घटना घडूनही गोपनियता बाळगली जात असल्याबाबत शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.

विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याबाबत पोलिसांकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. त्यामुळे तशी कुठलीही नोंद नाही. मात्र, या घटनेबाबत चाैकशी करून नेमका काय प्रकार आहे, हे शोधले जाईल.- रामकृष्ण जाधव, ठाणेदार, नेर

टॅग्स :Yavatmalयवतमाळ