आॅनलाईन लोकमतयवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची मुंबई येथील पुगलिया वूलन मिल्स लि. या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली. यात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातील अभिलाष लांजेवार व केमिकल इंजिनिअरिंग विभागाचा निहाल बेले यांचा समावेश आहे.सदर कंपनी पारंपरिक वस्त्रोद्योगांपेक्षा विभिन्न असलेल्या टेक्नीकल टेक्सटाईल या नवीन क्षेत्रासंबंधी काम करते. या क्षेत्राचे १२ विविध प्रकार आहेत. जीओ टेक, स्पोर्ट टेक, अॅग्रा टेक आदी प्रकार आहेत. या अनुषंगाने टेक्नीकल टेक्सटाईलद्वारे सैन्यासाठी लागणारे बुलेटप्रुफ जॅकेट, पॅराशूट फॅब्रीक, विमान व कारचे विविध भाग आणि औद्योगिक मशिनरीचे पार्ट तयार केले जाऊ शकते. पुगलिया वूलन मिल ही कंपनी टेक्नीकल टेक्सटाईल संबंधित कारचे विविध भाग बनविणारी कंपनी आहे. या कंपनीच्या उत्पादनाचा उपयोग रशिया, पोलंड, अमेरिका यासारख्या प्रगतशील देशामध्ये कार तयार करताना केला जातो. या कंपनीचे प्रतिनिधी प्रदीप ए. शिंदे यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतला. सर्वप्रथम टेक्नीकल टेस्ट घेण्यात आली. नंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड करण्यात आली. निवड झालेले अभिलाष लांजेवार व निहाल बेले यांना २.५० लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. तीन महिन्याच्या ट्रेनिंगनंतर त्यांना रशिया, पोलंड किंवा अमेरिकेमध्ये कंपनीतर्फे नियुक्ती दिली जाणार आहे.
‘जेडीआयईटी’च्या दोन विद्यार्थ्यांची मुंबईतील पुगलिया वूलन्समध्ये निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 12:31 AM