शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
8
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
9
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
10
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
11
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
12
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
13
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
14
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
16
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
18
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
19
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
20
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात ७४ कोटी

By admin | Published: January 28, 2017 2:22 AM

काँग्रेसच्या सत्ताकाळात उशिरा दिल्या जाणाऱ्या मदतीवर युतीने खरपूस टीका केली. आता तोच कित्ता युती शासनाने गिरविला आहे.

दुष्काळी मदत : नुकसानग्रस्तांसाठी जिल्हा प्रशासनाचा पाच कोटींचा प्रस्तावरूपेश उत्तरवार  यवतमाळ काँग्रेसच्या सत्ताकाळात उशिरा दिल्या जाणाऱ्या मदतीवर युतीने खरपूस टीका केली. आता तोच कित्ता युती शासनाने गिरविला आहे. २०१५ मध्ये झालेल्या मदतीच्या घोषणेचा निधी २०१७ मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वळता केला आहे. न्यायालयाने कानउघाडणी केल्यानंतर महसूल विभागाने तातडीची बैठक घेतली. यातून कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ७४ कोटी रूपये मिळणार आहेत. पाच तालुक्यातील गारपीटग्रस्तांना ११ कोटी तर अतिवृष्टीग्रस्तांसाठी पाच कोटींचा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. या मदतीची आशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोडली होती. यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या खात्यात कशाचे पैसे जमा झाले, याची माहितीही मिळाली नाही. ७४ कोटी रूपयांच्या मदतीसाठी पावणे दोन लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्याचे पत्र १० जानेवारीला जिल्हा प्रशासनाकडे आले. जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर करण्याचे आदेश तहसील प्रशासनाला दिले. यादीनुसार बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.२०१५ मध्ये अपुऱ्या पावसाने पीक परिस्थिती चिंताजनक झाली होती. शेतीचे उत्पादन घटले. शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. त्यात काही अटी टाकण्यात आल्या होत्या. ज्या शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत मिळाली, त्यांना ही मदत मिळणार नाही. मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला नव्हता, अशा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे. कळंब तालुका मात्र कापसाच्या मदतीपासून वंचित राहणार आहे. गारपीटग्रस्तांना ११ कोटी २०१६ मध्ये झालेल्या गारपिटीत बाभूळगाव, पुसद, दिग्रस, उमरखेड आणि महागाव या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांना ११ कोटी ७४ लाख ८६ हजार रूपयांची मदत मिळणार आहे. ही मदत तालुक्याकडे वळती करण्यात आली आहे. यासोबतच मे, जून, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यात शेतपिकांचे पाच कोटींचे नुकसान झाले. याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्याकडे पाठविला आहे.सोयाबीनला ५४, तर कापसासाठी १९ कोटीजिल्ह्याकडे वळत्या झालेल्या ७४ कोटी रूपयांच्या मदतीत सर्वाधिक ५४ कोटी ३४ लाख ९३ हजार ६२३ रूपयांची मदत सोयाबीन उत्पादकांना मिळणार आहे. तर १९ कोटी ६५ लाख ९४ हजार ९४८ कोटींची मदत कापूस उत्पादकांना मिळाली आहे. यवतमाळ ४ कोटी २४ लाख ७८ हजार १५४ रूपये, बाभूळगाव सात कोटी सहा लाख ७८ हजार ६६२ , आर्णी ५० लाख १२ हजार २३१, कळंब दोन कोटी ४५ लाख ५९ हजार ८८७, राळेगाव १ कोटी ९६ लाख २४ हजार ४५८, घाटंजी पाच कोटी ५५ लाख ५९ हजार ९४२, केळापूर ३० लाख ५६ हजार ७४५, वणी १२ लाख ७५ हजार ८५, दारव्हा तीन कोटी १० लाख ४१ हजार २३२, नेर १४ कोटी ७८ लाख ५८ हजार ६६१, पुसद १२ कोटी ४८ लाख ८८ हजार ७९४, दिग्रस नऊ कोटी ८८ लाख ५९ हजार २०५, उमरखेड नऊ कोटी २२ लाख ५८ हजार ८२८, महागाव दोन कोटी २९ लाख ३६ हजार ६९७ रूपये मिळाले आहेत.