सागवान जप्त : अमरावतीवरून जात होते हैदराबादकडेलोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील वाहतूक पोलिसाच्या सतर्कतेने सागवान तस्करी उघडकीस आली असून वाहनासह पाच लाखांचे सागवान जप्त केले. सदर सागवान अमरावतीहून हैदराबादकडे जात होते. या प्रकरणी दोघांना अटक केली.अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथून सागवान वाहन क्र.एम.एच.३८/२२३७ ने गुरुवारी रात्री जात होते. रात्री १२ वाजताच्या सुमारास वाहतूक शिपाई मधुकर राठोड यांना संशय आला. त्यांनी वाहन थांबविले असता त्यात सागवान आढळले. त्यांनी थेट वाहन पोलीस ठाण्यात आणले. याची माहिती वन विभागाला दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी मळघने, वनक्षेत्र अधिकारी प्रियंका कोठेकर यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी आरोपी रेहान खान साजीद खान (२४), रशिद खान हफीज खान (२५) याला ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून कटसाईजचे १०८ नग सागवान जप्त केले. याची किमत दोन लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या दोघांविरुद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांच्या या कारवाईबद्दल शहरात उलटसुलट चर्चा सुरू होत्या.
उमरखेड पोलिसांनी पकडले सागवान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 2:27 AM