लोकमत न्यूज नेटवर्कफुलसावंगी : पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पशुपालकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर रविवारी फुलसावंगी येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालला. चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. मात्र या मोहीमेने लघुव्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्याचा त्रास गोपालकांना होत होता. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने परिसरातील नागरिकांनी दोन दिवसापूर्वी फुलसावंगीत चक्काजाम आंदोलन केले. त्यावेळी प्रशासनाने दोन दिवसात अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी सकाळी अतिक्रमण हटाव पथक फुलसावंगीत दाखल झाले. सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागांवचे उपअभियंता एस.बी. नाईक, शाखा अभियांता एस.एम. शेख, नायब तहसीलदार एस.बी. शेलार, सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत, दराटीचे ठाणेदार शैलेष ठाकरे, तलाठी गजानन कवाने यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्यास प्रारंभ झाला.अतिक्रमणावर बुलडोजर चालल्याने येथील अनेक लघुव्यवसायिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. पानठेला, हॉटेल, केशकर्तनालय, कापड, जनरल, चप्पलची दुकाने उध्वस्त झाली. रविवारी दिवसभर सुरु असलेल्या या मोहीमेने प्रवाशांना चहा आणि पाणी मिळाले नाही.
अखेर फुलसावंगीत अतिक्रमणावर बुलडोजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 9:50 PM
पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील अतिक्रमण काढण्यासाठी पशुपालकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत अखेर रविवारी फुलसावंगी येथील अतिक्रमणावर बुलडोजर चालला.
ठळक मुद्देपशुपालकांचे आंदोलन : लघुव्यावसायिकांवर मात्र उपासमारीची वेळ