शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

डॉक्टरची हत्या : हल्लेखोराने १२ मिनिटात उमरखेडवरून गाठली ढाणकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 10:25 AM

डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञाताने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

ठळक मुद्देबारमधील सीसीटीव्हीत आरोपी कैदमराठवाड्याकडे पोलीस पथके रवानामारेकऱ्याच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलन

यवतमाळ : उमरखेड येथील बालरोगतज्ज्ञाची मंगळवारी सायंकाळी भररस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनेनंतर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून हल्लेखोर हा ढाणकी मार्गाने मराठवाड्यात पळाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याने उमरखेड ते ढाकणी हा प्रवास अवघ्या १२ मिनिटात केला. ४.४५ वाजता गोळीबार करून तो ढाणकितील बारमध्ये ५.११ मिनिटांनी आढळून आला.

हाच धागा पकडून त्याच्या शोधात पोलीस पथके रवान झाली आहे. तर तत्काळ आरोपीला अटक करा या मागणीसाठी डॉक्टरच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

डॉ. हनुमंत धर्मकारे हे उपजिल्हा रुग्णालयातून चहा पटरीवर आले. तेथून चहापान घेवून बाहेर पडले असता पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोराने त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. नंतर हा हल्लेखोर दुचाकीने पसार झाला. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक, गुन्हे अन्वेषण विभाग, सायबरसेल, ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबचे पथक, न्याय वैज्ञानिक शाळा पथक व स्थानिक गुन्हे शाखा पथक यांना पाचारण केले. पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे हे दोन्ही अधिकारी रात्रभर तळठोकून होते.

डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा मृतदेह वैद्यकीय चिकित्सेससाठी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तेथे डॉक्टरचे नातेवाईक व समाजबांधवांनी आरोपीला अटक हेाईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला. नांदेड शहरात रास्त रोको करण्याचा प्रयत्न केला.

मारेकऱ्याची चेहऱ्याने ओळख पटली आहे. त्याच्या एकूण हालचालीवरुन तो सरईत गुन्हेगार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे हत्या सुपारी देवून तर करण्यात आली नाही ना याही दिशेने पोलिसांचा आता तपास सुरू आहे.

रुग्णालये बंद ठेवून उमरखेडमध्ये घटनेचा निषेध

डॉक्टरच्या हत्येचा निषेध म्हणून उमरखेड शहरातील शासकीय व खासगी रुग्णालये बंद ठेवण्यात आली आहे. केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशननेसुद्धा या बंदला पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पावडी यांना निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली.

मृत डॉक्टराच्या भावाला हृदयविकाराचा झटका

डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येनंतर हादरलेला लहान भाऊ डॉ. बालाजी धर्मकारे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हत्येचा छडा २४ तासांत लावू : पोलीस अधीक्षक

डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्या हत्येचे पडसाद बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही उमटले. सदस्यांनी डॉ. धर्मकारे यांच्य हत्ये संदर्भात चौकशी आणि तपासाबाबत मुद्दे उपस्थित केल्यानंतर पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. २४ तासांत या हत्येचा छडा लावू, असे त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारdoctorडॉक्टरDeathमृत्यू