शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

उमरखेडला हजार वृक्ष लावण्याचा संकल्प

By admin | Published: June 21, 2017 12:33 AM

एक हजार वृक्ष लागवण व संवर्धनाचा संकल्प हाती घेत मागील वर्षात पहिल्या टप्प्यात तीनशे झाडे

संवर्धनही करणार : औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा उपक्रम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : एक हजार वृक्ष लागवण व संवर्धनाचा संकल्प हाती घेत मागील वर्षात पहिल्या टप्प्यात तीनशे झाडे लावून व त्यांचे संवर्धन व संगोपन करून ह्या वर्षातील वृक्षारोपणाचा श्रीगणेशा शहरातील श्रीकृष्ण मंदिराजवळील परिसरात गोकुळ नगर रोडवर करण्यात आला. समितिद्वारे वृक्ष लावण्यासाठी महाश्रमदान करण्यासाठी करण्यात आलेल्या आवाहनास औदुंबर वासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये मराठा सेवा संघ, उद्देश सोशल फाऊंडेशन, अंबोना कृती समिती व शहरातील विविध संघटना व त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रमदान करून समितीच्या कार्यात आपले योगदान दिले. यावेळी स्वामी समर्थ मंदिराच्या आवारात माजी आमदार विजय खडसे यांच्या अध्यक्षतेत एक कार्यक्रम घेण्यात आला. विजय रेघाटे, वसंत जाधव यांनी विचार व्यक्त केले. नगर परिषदेचे अध्यक्ष नामदेव ससाणे यांनी समितीस पाचशे रोपटे व ट्री गार्ड देण्याचे आश्वासन दिले. उपाध्यक्ष अरविंद भोयर यांनी सवोर्तोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले. भाजपा शहर अध्यक्ष महेश काळेश्वरकर यांनी दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त समितीस एक हजार रुपये देण्याचा संकल्प केला. मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी यांनी अकराशे रुपये दिले. समितीचे सदस्य गोविंद काळे, डॉ. एस. पी. गोरे , सुरेंद्र कोडगिरवार, डॉ. अरुण बंग शिवाजीराव माने, रेघाटे काका,प् लक्ष्मीकांत नंदनवार, गजानन चौधरी, दिलीप भंडारे, अक्रमभाई, दानेश्वर खांडरे, संतोष माने, समितीचे कार्यध्यक्ष दीपक ठाकरे आदींसह परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.