रफीक पारनेर : जमात-ए-इस्लामी हिंदची पुसदमध्ये पत्रपरिषदपुसद : सध्याच्या आधुनिक काळात समाजाला ज्ञानवर्धित संगणक समजले पण संत तुकोबाराय, संत कबीर, संत तुकडोजी महाराज आणि मोहम्मद पैगंबरांनी शिकवलेल्या जीवनाचा उद्देश खऱ्या अर्थाने समजला नसल्याने आजची युवा पिढी भरकटल्याची खंत अहमदनगर येथील डॉ. मोहम्मद रफिक पारनेर यांनी व्यक्त केली. जमात-ए-इस्लामी हिंदतर्फे देशव्यापी अभियान शांती व मानवता या नावाने राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवाजी महाराज, संत तुकोबाराय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, संत कबीर व मोहम्मद पैगंबरांनी कोण्या एका धर्मासाठी नव्हे तर चराचर सृष्टीतील मानव जातीच्या विश्वाच्या कल्याणासाठी आदर्श कुटुंब व्यवस्था घडवण्यासाठी संदेश यावेळी त्यांनी पत्रपरिषदेतून दिला. आज समाजात सद्भावना वृद्धींगत करण्याची गरज आहे. नव्या पिढीला मार्गदर्शनाची गरज आहे, अशी अपेक्षा विचारवंत डॉ. रफीक पारनेर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. या पत्रकार परिषदेला जमाते इस्लामी हिंदचे जिल्हा अध्यक्ष अ. हकीम शेख, तालुकाध्यक्ष काजीम दाद खान, संयोजक अलियार खान, प्रमुख वहीद खान, नुरुल्लाह खान, शेख नईम उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
संतांची शिकवण खऱ्या अर्थाने समजून घ्या
By admin | Published: September 05, 2016 1:03 AM