शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मशिदीचे अंतरंग समजून घेताना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 9:50 PM

मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात.

ठळक मुद्देसर्वधर्मीयांसाठी माहिती : जमात-ए-इस्लामी हिंदच्या उपक्रमातून कार्याची ओळख

काशीनाथ लाहोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मशिदीच्या आत काय असते? मशिदीचे कार्य कसे चालते? अजान म्हणजे काय? नमाजपूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागते? अशा अनेक गोष्टींबाबत मुस्लिमेतर नागरिकांना उत्सुकता असते. अनेक गैरसमजही असतात. हे गैरसमज दूर करून इतर धर्मीयांनाही मशिदीचे कार्य कळावे, यासाठी जमात-ए-इस्लामी हिंदने ईद मिलन आणि मशिद परिचय हा उपक्रम दोन वर्षांपूर्वी लातूर येथून सुरू केला.जमात-ए-इस्लामी हिंदच्या यवतमाळ शाखेच्यावतीने अल फुरकानिया मशिदीत (सारस्वत ले-आऊट) निवडक पुरोगामी कार्यकर्त्यांसाठी ईद मिलन आणि मशिद परिचयाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुस्लीम लेखक तथा पत्रकार आणि शोधन मासिकाचे माजी संपादक नौशाद उस्मान यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून समर्पक विवेचन केले. अजान आणि नमाजचे प्रात्यक्षिक दाखविले. विशेष म्हणजे, हेमंत कांबळे यांनी अजान दिली.मशिदीला हिरवाच रंग दिला पाहिजे, असे बंधन नाही. टोपी घालणे हे सन्मानदर्शक आहे. ती अत्यावश्यक नाही. टोपीशिवायही नमाज पढता येतो. अजान म्हणजे, पवित्र परमेश्वराकडे येण्याचे आवाहन असते. नमाजपूर्वी प्रसन्न वाटावे आणि जंतंूपासून संरक्षण व्हावे, यासाठी हात, पाय आणि चेहरा धुण्यासाठी विशिष्ट जागा असते. कोणाच्या जीवावर संकट आले तर नमाज अर्धवट सोडून त्याला वाचवता येते. महिलांना मशिदीत प्रवेश असतो. त्या नमाज अदा करून शकतात. जिथे हात-पाय धुण्याची आणि स्वच्छतागृहाची स्वतंत्र व्यवस्था आहे, तिथेच महिलांना प्रवेश असतो.हा उपक्रम आयोजित करण्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे शहरध्यक्ष जियाउद्दीन, रियाज सिद्दीकी, एजाज जोश, डॉ. मुजीब, शहाबुद्दीन, रहेमान साहब, अल्लाउद्दीन खिलजी, काझी निझामुद्दीन सहभागी होते. यावेळी अंकुश वाकडे, दीपक नगराळे, डॉ. दिलीप घावडे, डॉ. दिलीप महाले, प्रवीण भोयर, सुदर्शन बेले, दिलीप बेलसरे, दीपक वाघ, संतोष ढवळे, राजू देशमुख, यशवंत इंगोले, विठ्ठल नागतोडे, मनोज उम्रतकर, योगेश धानोरकर, भवरे आदी उपस्थित होते.पूर्वापार परंपरा कायमयानिमित्ताने अत्यंत सखोल चर्चा झाली. अकबर म्हणजे अल्ला. मराठीत महादेव. येथे अकबर राजाशी काहीही संबंध नाही. पूजा करणे इस्लामविरोधी आहे. मात्र भारतातील बहुतांश मुस्लीम हे धर्मांतरित असल्याने पूर्वापार परंपरा त्यांनी कायम ठेवल्या आहेत. परिणामी भारत, पाकिस्तान, बांग्लादेश अािण अफगाणिस्तान येथे पीर, ताज, अवलिया, मोहर्रम, दर्गाह येथे पूजा केली जाते. इस्लाम हा परिवर्तनशील धर्म असून जगात इस्लामने परिवर्तनातून अनेक पर्याय स्वीकारले आहेत. भारत मात्र याबाबत अपवाद आहे. भारतीय मुस्लीमांमध्ये भयंकर अंधश्रद्धा आहेत. अशा अनेक मुद्द्यांवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. चर्चेतून अनेक गोष्टी नव्याने कळल्या. अनेक गैरसमज दूर झाले.मशिदीतले मेंबरमशिदीमध्ये कोणाचाही फोटो नसतो. तर एक विचारपीठ असते. त्याला मेंबर म्हणतात. इमाम दर शुक्रवारी आणि ईदच्या दिवशी नमाजनंतर प्रासंगिक भाषण आणि उपदेश करतात. इमामांना नमाज पढण्यासाठी एक जानमाज (आसन) असून काही पुस्तके एका टेबलावर ठेवलेली असतात.