शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

‘एसटी’ कर्मचाऱ्यांच्या पूर्ण पगारासाठी संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 5:00 AM

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे तंत्र बिघडले आहे. मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला नाही. एप्रिलमध्ये खूप उशीर झाला आणि आता मे पेड इन जूनच्या पगाराचा तर मोठा वांदा सुरू झाला आहे. एकीकडे खूप उशीर होऊनही केवळ ५० टक्के पगार खात्यात जमा होणार आहे.

ठळक मुद्देपिळवणूक थांबवा : कामगार संघटना आणि इंटक आंदोलन करणार

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या १०० टक्के पगारासाठी कामगार संघटना आक्रमक भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे. दरम्यान, महिन्याची शेवटची तारीख आली तरी पगार झाला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. मागील तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना अनियमित वेतनाचा सामना करावा लागत आहे.कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाचे तंत्र बिघडले आहे. मार्च महिन्याचा पगार पूर्ण दिला नाही. एप्रिलमध्ये खूप उशीर झाला आणि आता मे पेड इन जूनच्या पगाराचा तर मोठा वांदा सुरू झाला आहे. एकीकडे खूप उशीर होऊनही केवळ ५० टक्के पगार खात्यात जमा होणार आहे.शासनाने सवलत प्रतिपूर्तीपोटी दिलेल्या पैशाच्या भरवशावरच कर्मचाऱ्यांचे पगार केले जात आहे. मे महिन्याच्या पगाराकरिता २७० कोटी रुपये देण्यात आले. प्रत्यक्षात पगारासाठी २४९ कोटी रुपये लागतात. यापेक्षा जास्त रक्कम मिळालेली असताना पूर्ण पगार देण्यात महामंडळाला कोणती अडचण आहे, हा प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. अनेक कर्मचाऱ्यांना केवळ २० ते २५ हजार रुपयांएवढे वेतन आहे. अर्धा पगार म्हणजे हातात दहा ते बारा हजार रुपये येतील. एवढ्या कमी रकमेत महिन्याचा खर्च भागवायचा कसा, याची चिंता त्यांना आहे.प्रशासनाचा निर्णय अन्यायकारकमुळातच एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन अत्यंत कमी आहे. कमी वेतनामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ येईल, त्यामुळे पूर्ण वेतन द्यावे, असे महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतना व्यतिरिक्त खासगी कंत्राटदारांची बिले दिल्यास आंदोलन केले जाईल, असे त्यांनी कळविले आहे.महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनएसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी कायमस्वरूपी मदत करावी, असे निवेदन महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशनने मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. महामंडळाचा कारभार व्यवस्थित होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी भरीव मदत करावी, असे फेडरेशनचे मुख्य सचिव राजू भालेराव यांनी म्हटले आहे.मान्यता प्राप्त कामगार संघटनेचे निदर्शनेमे महिन्याचे पूर्ण वेतन मिळावे, रोजंदार गट क्र.१ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या, रोज निघणारी नवनवीन परिपत्रके आणि कामगारांची होणारी पिळवणूक याविरोधात एसटी कामगार संघटना निदर्शने करणार आहे. ३ जुलै रोजी केंद्रीय प्रमुख संघटनांनी सरकारच्या कामगार विरोधी धोरणाविरूद्ध देशव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या सद्यस्थितीत उद्भवलेल्या प्रश्नांवर निदर्शने केली जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :state transportएसटी