लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील विना अनुदानित तत्त्वावर चालणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीवर लागले तेव्हापासून विनावेतन काम करावे लागत आहे. आम्हाला कुटुंब आहे. घरचा कर्ताव्यक्ती विनावेतन काम करत असताना कुटुंबाचे होणारे हाल पहावत नाही म्हणून कामाचा मोबदला देण्यात यावा, याकरिता तालुक्यातील विना अनुदानित उच्च माध्यमिक शाळेच्या शिक्षकांनी तहसीलदार श्रीकांत निळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन देण्यात आले.महाराष्ट्रात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा अनुदानाचा शासन निर्णय काढून शिक्षकांना वेतन देण्यात यावे, अन्यथा नो पेमेंट नो वर्क या तत्त्वानुसार शालेय कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येईल. १४ आॅगस्ट रोजी होणाºया राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुदानाला मंजुरी देण्यात यावी. अन्यथा ता १९ आॅगस्टपासून बेमुदत शाळा बंद आंदोलन राज्यभर करण्यात येईल. यामध्ये विद्यार्थ्यांच्या नुकसानीला शासन जबाबदार राहील. याची दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी उच्च माध्यमिक विनाअनुदानित तालुका शिक्षक संघटनेचे सदस्य उमाशंकर सावळकर, प्रवीण सोने, जितेंद्र उमरे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विनावेतन काम करून अर्थाजन कोठून करावे, असा प्रश्न आहे.
वेतनासाठी विनावेतन शिक्षकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 9:57 PM