लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. नियमांची पायमल्ली करून येथे रस्त्यावर वाहने उभी ठेवली जातात.बसस्थानक चौकापासून काही मीटर अंतरावर दारव्हा मार्गावर ट्रॅव्हल्स पॉर्इंट आहे. या पॉर्इंटसमोरूनच वाहतुकीसाठी यू-टर्न ठेवण्यात आला आहे. अर्धाअधिक रस्ता ट्रॅव्हल्सने व्यापलेला असतो. कुणी साधे हटकले तरी थेट मारहाण केली जाते. वाहतूक शाखेचे अधिकारी वाहन घेऊन या मार्गावरून घिरट्या घालतात. सोपस्कार म्हणून कधी तरी रस्त्यावरची ट्रॅव्हल्स बाजूला करण्याची तसदी घेतात. मात्र येथे अपवादानेच ट्रॅव्हल्स मालकांना मेमो अथवा दंड केला जातो. ग्रामीण भागातून आलेल्या किंवा रुग्ण घेऊन असलेल्या दुचाकी, चारचाकी चालकांना नियमांची भलीमोठी लिस्ट वाहतूक शाखेकडून दाखविली जाते. अक्षरश: जाचक पद्धतीने दंड वसूल केला जातो. मात्र रस्ता रोखून धरणाऱ्या ट्रॅव्हल्स चालकांना खुले अभय दिले जाते. ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. प्रवासी मिळविण्यासाठी जागेवरच ट्रॅव्हल्स उभ्या ठेऊन सतत मागेपुढे हलविल्या जातात. ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. वाहतुकीची कोंडी झाल्याने एका नव्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानक चौकातील सिग्नल हा पाच मार्गांचा होता. तो आता चार मार्गांचा करण्यात आला. मात्र रस्त्यावरील ट्रॅव्हल्सचे अतिक्रमण, प्रवासी घेण्यासाठी लागणारे आॅटो हे नेहमीचेच चित्र झाले आहे. वाहतूक शाखेतील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या वरिष्ठांना या समस्येचे कठोर भूमिकेतून चुटकीसरशी निरसन करता येणे शक्य आहे. मात्र येथे प्रशासकीय अधिकार वापरण्यात कुचराई केली जात असल्याचे दिसते.
ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर अनियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 9:11 PM
शहरातील वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. त्यानंतरही ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर थेट रस्त्याच्या मधोमध तासंतास वाहने उभी ठेऊन प्रवाशांची चढ-उतार केली जाते. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
ठळक मुद्देदारव्हा मार्गावर वाहतूक कोंडी : रस्त्यावरच लागतात प्रवासी वाहने