लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरींचे खोदकाम होत आहे. खोदकामासाठी मजुरांऐवजी सर्रास जेसीबीचा वापर केला जात आहे.शासनाने सार्वजनिक विहिरींसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या निधीची अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदार विल्हेवाट लावत आहे. तालुक्यात ठिकठिकाणी विहिरी खोदकामासाठी मजुरांऐवजी चक्क जेसीबीचा वापर केला जात आहे. वरिष्ठ अधिकारी थातूरमातूर पाहणी करून संबंधित कंत्राटदारांना देयके अदा करीत आहे. ग्रामपंचायतींनी मागणी केल्यानुसार मग्रारोहयोअंतर्गत सार्वजनिक विहिरींच्या खोदकामास मंजुरी देण्यात आली. मात्र मजुरांऐवजी जेसीबीचा वापर होत असूनही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.गटविकास अधिकाऱ्यांनी या कामांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. मात्र त्यांना वेळ नसल्याचा आरोप गावकरी करीत आहे. यापूर्वीही निधीची विल्हेवाट लावल्याने अद्याप पाणीटंचाई कायम आहे. किमान यावर्षी तरी भीषण दुष्काळी परिस्थितीत प्रशासनाने विहीर खोदकामांवर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. नियमांना तिलांजली देवून खोदकाम होत असल्यास कारवाई करण्याची मागणी गावकºयांकडून होत आहे. पंचायत समितीचे अभियंता त्रिवेदी यांना याबाबत गावकºयांनी संपर्क साधला असता ते कानाडोळा करीत आहे.याबाबत तहसीलदार भगवान कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासकीय नियम मोडीत काढणाºयांविरुद्ध चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.
विहीर खोदकामासाठी जेसीबीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 10:05 PM
मग्रारोहयोअंतर्गत तालुक्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विहिरींचे खोदकाम होत आहे. खोदकामासाठी मजुरांऐवजी सर्रास जेसीबीचा वापर केला जात आहे.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : दुष्काळी परिस्थितीत मजुरांच्या हाताला काम नाही