गेल्या महिनाभरापासून तर या परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’, या उक्तीप्रमाणे पाणीपुरवठा विभागाकडून पाणी पुरविले जाते. कधी हवा, तर कधी पाणी आणि कधी काहीच नाही, असा लपंडाव सुरू आहे. या त्रासाला कंटाळून बुधवारी सर्व नागरिकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे अभियंता रुपेश चव्हाण यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनी मागण्या ऐकून घेतल्या. लवकरच यावर तोडगा काढला जाईल आणि नियमित वेळेत पाणीपुरवठा केला जाईल, अशी ग्वाही दिली. या वेळी नगरसेविका डॉ. रुपाली जयस्वाल, प्रा. अशोक तिवारी, मुकुंद देशपांडे, दीपक महल्ले, कोंडबाराव मुढाणकर, प्रा. गजानन जाधव, हेमंत मेश्राम, बालाजी घाटगे, विजय क्षीरसागर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.