शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

वहम् आणि अहम् हे तणावाचे कारण

By admin | Published: February 28, 2017 1:27 AM

जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे.

प्रभा मिश्रा : उमरखेड येथे ‘तणावमुक्ती व उपाय’ विषयावर अध्यात्मिक प्रवचन उमरखेड : जागतिक आरोग्य संघटनेने २०१७ हे भयंकर मानसिक तणावाचे जागतिक वर्ष म्हणून घोषित केली आहे. आज चौघांमध्ये एक जण तणावाखाली जगत आहे. हा तणाव दुसऱ्या कुणी निर्माण केला नसून चुकीच्या पद्धतीने विचार केल्यामुळे आपणच आपल्यावर ओढवून घेतलेले संकट होय. आपल्यातील वहम म्हणजे अनाठायी शंका आणि अहम म्हणजे अहंकार हेच प्रचंड मानसिक तणावाला कारणीभूत आहे, असे प्रतिपादन डॉ.प्रभाबहण मिश्रा (माऊंटअबू) यांनी केले. येथील माहेश्वरी खुले नाट्यगृहात ‘तणावमुक्ती एवम् सफलता के पांच कदम’ या विषयावर त्यांचे आध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालय उमरखेड सेवा केंद्रातर्फे हे पाच दिवसीय आध्यात्मिक शिबिर होत आहे. पहिल्या दिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळच्या सत्रात मुख्य प्रवचक म्हणून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, तणावग्रस्त अवस्थेतूनही विचाराने आणि धैर्याने मार्ग काढला पाहिजे. सतत वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यांच्या पूर्तीसाठी अविचाराने अवलंबलेल्या मार्गामुळे समस्या वाढून माणूस तणावग्रस्त होत आहे. अनाठायी स्पर्धा, दुसऱ्यांच्याप्रती इर्षा, अनाठायी अहंकार आणि परस्परांविषयी विनाकारण शंका वाढीस लागणे याबाबी मानसिक तणावाला कारणीभूत ठरत आहे. त्यावर कोणत्याही डॉक्टरकडे इलाज नाही. आपले विचार स्वच्छ आणि मन संतुलित ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी भारतीय अध्यात्म शैलीत परमात्मा चिंतन, मनाच्या स्थिरतेसाठी ध्यान करणे क्रमप्राप्त झाले आहे. डोके थंड ठेवणे, वाणीची मधुरता, परस्परांविषयी प्रेम भावना जोपासून विचाराने काम केले तर तणावमुक्ती साधता येईल. प्रवचन ऐकण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (प्रतिनिधी)विद्यार्थिनींचे संस्कृती नृत्यपाच दिवसीय अध्यात्मिक शिबिराचे उद्घाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी मुख्य प्रवचक म्हणून माऊंटअबू येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्व विद्यालयाच्या डॉ.प्रभाबहन मिश्रा, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार विजय खडसे, व्यापारी संघाचे नारायणदास भट्टड उपस्थित होते. डॉ.प्रभा मिश्रा यावेळी म्हणाल्या, आपण शरीरालाच सर्वस्व मानून बसलो. मी एक आत्मा आहे, हे विसरलो. आपण बाह्य प्रगती खूप केली. परंतु आंतरिक प्रगती थांबवली. त्यामुळेच आज सगळे जण ताण-तणावात जगत आहेत. आपल्यातील आक्रोश आध्यात्मिक विचार अवलंबूनच घालवता येतील. यावेळी स्थानिक विद्यार्थिनींनी भारतीय संस्कृतीवर आकर्षक नृत्य सादर केले. दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.