आरती फुपाटे : लोहारा येथून पोलिओ लसीकरण मोहिमेला शुभारंभयवतमाळ : आपल्या बालकांना पोलिओ सारख्या अपंगत्वापासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने मुलास लस देणे आवश्यक आहे. आपल्या घरी आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी येईल, याची वाट न पाहता प्रत्येकाने बुथवर जाऊन लसीकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे यांनी केले.पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याला रविवारी जिल्ह्यात सुरूवात झाली. लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आरती फुपाटे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, समाजकल्याण सभापती लता खांदवे, पंचायत समिती सदस्या संगिता पारधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड.राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.जी. धोटे, लोहाराचे सरपंच अनिल देशमुख, उपसरपंच कविता जामदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ.भगत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.पोलिओचे समूळ उच्चाटण करण्यासाठी प्रत्येक बालकाचे लसीकरण आवश्यक आहे. पालकांनी बुथवर नेऊनच बालकांचे लसीकरण केले पाहिजे. एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी, असे पुढे बोलताना फुपाटे म्हणाल्या. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांचेही भाषण झाले. एखाद्या बालकास पोलिओ झाल्यास त्याला पोलिओमुक्त करता येत नाही. त्यामुळे पोलिओ होऊच नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक बालकाचे लसीकरण झाल्यास पोलिओला थांबविता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात एकही पोलिओ रूग्ण आढळणार नाही, यासाठी दक्ष राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी, सभापती नरेंद्र ठाकरे, सरपंच अनिल देशमुख यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राठोड यांनी केले. यवतमाळ नगरपरिषदेच्या पाटीपुरा येथील आयुर्वेदीक रुग्णालयातसुद्धा नगराध्यक्ष सुभाष राय, उपाध्यक्ष मुन्ना दुबे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, परिविक्षाधिन आयएएस अधिकारी निमा अरोरा, नगर परिषद सभापती ज्योती खोब्रागडे, मंदा डेरे, नगरसेविका डॉ.अस्मिता चव्हाण यांच्या उपस्थितीत लसीकरण करण्यात आले. त्यानंतर पाचधारा पोडावरही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लसीकरण केंद्रास भेट देऊन लसीकरण केले तसेच मोहिमेच्या अंमलबजावणीची पाहणी केली. (प्रतिनिधी)
प्रत्येक बालकाचे लसीकरण आवश्यक
By admin | Published: January 18, 2016 2:32 AM