शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
3
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
4
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
5
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
6
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
7
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
8
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
9
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
10
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
11
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
12
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
13
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
14
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
15
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
16
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
17
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
18
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
19
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
20
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा

लस साठवण क्षमता 180 लिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 5:00 AM

कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी लसीकरणाचे सेशन ठरविण्यात आले आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर्स यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एक हजार ९११ हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर शहरी भागात १७६ आरोग्य कर्मचारी राहणार आहे. लस पोहोचविण्यासाठी ८२ कोल्ड चेन पाॅईंट तयार करण्यात आले आहे. याच ठिकाणी लस साठविली जाणार आहे.

ठळक मुद्देकोविड लसीकरणाचा पहिला टप्पा : प्रशासन डोळ्यात तेल घालून सज्ज

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरणाचा नकाशा व वर्क चार्ट तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय १८८ सुपरवायझर आणि ५३८ लसीकरण कर्मचारी (व्हॅक्सीनेटर्स) राहणार आहे. त्यांना लसीकरणाबाबत प्रशिक्षणही देण्यात आले आहे. पहिला टप्पा हा केवळ आरोग्य यंत्रणेतील व कोविड काळातील फ्रन्टलाईन वाॅरिअर असलेल्यांनाच दिला जाणार आहे. त्यासाठी १४ हजार ५३८ इतकी संख्या निश्चीत केली आहे. कोरोना लसीकरण मोहीम अधिक प्रभावी करण्यासाठी लसीकरणाचे सेशन ठरविण्यात आले आहे. त्यात हेल्थ केअर वर्कर्स यांना प्राधान्याने लस दिली जाणार आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. ग्रामीण भागात एक हजार ९११ हेल्थ केअर वर्कर्स आहेत. तर शहरी भागात १७६ आरोग्य कर्मचारी राहणार आहे. लस पोहोचविण्यासाठी ८२ कोल्ड चेन पाॅईंट तयार करण्यात आले आहे. याच ठिकाणी लस साठविली जाणार आहे. नियोजन करून लसीकरणाला पहिल्या टप्प्यात यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे. जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर हे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी आरोग्य केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी आरोग्य विभागाकडून डाॅक्टर्स, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, कक्ष सहायक, मदतनीस या सर्वांची यादी तयार करण्यात आली होती. त्यानंतरच लसीची मागणी झाली. मात्र अजून लसीचा डोज किती असणार हे निश्चीत झाले नाही. त्यामुळे तालुकानिहाय कुणाला किती लस पाठवावी लागेल, याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले.

लस साठविण्यासाठी ११८ फ्रीझरकोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. ही लस आल्यानंतर साठविण्यासाठी ११८ डीप फ्रीझर जिल्ह्यात उपलब्ध आहेत. एका विशिष्ट तापमानातच कोरोनाची लस ठेवावी लागणार आहे. त्याकरिता ही तयारी करण्यात आली आहे. सुरुवातीला १८० लिटर लस येणार असल्याने त्यासाठीचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. 

लस पोहोचविण्यासाठी एक वाहनजिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड शिल्ड ही लस पोहोचविली जाणार आहे. पहिला टप्पा असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच लसीकरण केले जाणार आहे. त्यामुळे एक वाहन निश्चीत करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेकडे पुरेशी वाहने उपलब्ध असून ६६ वाहने सध्या कार्यरत आहेत. गरजेनुसार वितरणासाठी त्यांचा वापर केला जाणार आहे. 

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या