शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

वंचितने यवतमाळ शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट

By सुरेंद्र राऊत | Published: February 29, 2024 1:29 PM

महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते असा आरोप वंचितने केला.

यवतमाळ :  शहरात होणारा वेळी अवेळी अनियमितता पाणी पुरवठा,आणि इतर समस्या सोडविण्याकरिता वंचित बहुजन आघाडीच्या वतिने गुरूवारी जीवन प्राधिकरण कार्यालय  यवतमाळ येथे धडक देण्यात आली. यावेळी  पाण्याच्या घागरीवरच टंचाईच्या समस्या लिहून पदाधिकाऱ्यांना कार्यकारी अभियंता यांना रिकामी घागर भेट दिली. 

यवतमाळ शहराची तहान भागवणाऱ्या धरणात मुबलक असणारा पाणी साठा, बेंबळा धरणावरून अमृत योजनेतून होणारा पाणी पुरवठा इत्यादी मुबलक पाणी स्रोत असून सुद्धा, फक्त अधिकाऱ्यांच्या बेपर्वाई आणि ढिसाळ नियोजनामुळे शहरात रात्री बेरात्री अनियमितता पाणी,पुरवठा होत आहे. महिलांना,नागरिकांना नळाला पाणी येण्याची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. त्यामुळे रोज ठराविक वेळेनुसार स्वच्छ आणि जंतू विरहित नियमित पाणी पुरवठा करावा,कर्तव्यात कसुर करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांचेवर कठोर कार्यवाही करावी, इत्यादी समस्या पाण्याच्या घागरीवर लिहून ही घागर कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक स्वरूपात भेट दिली. 

सर्व समस्यांचे तातडीने निवारण करण्याची विनंती करण्यात आली.  अन्यथा वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावर कार्यकारी अभियंता यांनी सर्व समस्या तातडीने सोडवण्यात येतील असे आश्वासन दिले.  यावेळी वंचितचे जिल्हा अध्यक्ष डॉ. निरज वाघमारे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा धम्मवती वासनिक,जिल्हा महासचिव शिवदास कांबळे,युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, जिल्हा कोषाध्यक्ष अरुण कपिले, महिला महासचिव पुष्पा सिरसाट,सरला चचाने महिला उपाध्यक्षा वंदना उरकुडे,मीना रणीत, सचिव भारती सावते शहराध्यक्ष कुंदन नगराळे,शहर महासचिव विलास वाघमारे,शैलेश भानवे कोषाध्यक्ष उत्तमराव कांबळे शह राध्यक्ष करुणा चौधरी,शहर महासचिव रत्नमाला कांबळे,शिला वैद्य,शोभना कोटंबे सुकेशिनी खोब्रागडे आनंद भगत, प्रसेंजित भवरे, सुनील वाघमारे, कल्पना सिरसाट, निशा निमकर,निलेश स्थूल सुधाकर वासनिक, देवानंद कांबळे, प्रवीण करमणकर, संदीप हरणे सतीश कांबळे, सुमती खंडारे, माया मस्के, प्रज्ञा देशभ्रतार, शालू खोब्रागडे,सरिता भोवते सुरेश खंडारे, रेखा मोहोड,पौर्णिमा गजभिये, पूजा राऊत,यांसोबतच वंचित चे शेकडो कार्यकरता उपस्थित होते.