लोकमत न्यूज नेटवर्कवणी : शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे. परिणामी सीसीआयचे पारडे अद्यापही रिकामेच आहे. गेल्या १२ दिवसांत सीसीआयने केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी केला. याउलट येथील महावीर अॅग्रीकेअर या खासगी बाजार समितीत व्यापाºयांनी गेल्या १२ दिवसांत ७० हजार क्विंटल कापूस खरेदी करीत विक्रम केला.शासनाने यंदा कापसाला प्रतिक्विंटल चार हजार ३२० रुपये हमीभाव जाहीर केला. या उलट खासगी व्यापाºयांनी कापूस विक्री हंगामाच्या प्रारंभापासूनच चढ्या भावाने कापूस खरेदी सुरू केली. वणीत चार हजार ५५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत कापसाचा भाव वधारला. त्यातच सीसीआयची कापूस खरेदी किचकट आणि भावही कमी असल्याने या भागातील शेतकºयांनी यावेळी खासगी व्यापाºयांनाच कापूस विकणे पसंत केले. सीसीआयने वणीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत ३० आॅक्टोंबरला कापूस खरेदीचा मुहूर्त साधला. मात्र पहिल्या दिवशी दुपारनंतर उद्घाटनाला केवळ दोन वाहनात भरलेला कापूस विक्रीसाठी पोहचला. ही दोनही वाहने मिळून सीसीआयने हमीभावाने १६ क्विंटल ४५ किलो कापूस खरेदी केला. सीसीआयची खरेदी अतिशय धिम्यागतीने सुरू आहे. मागील १२ दिवसांत सीसीआयला केवळ ७९ क्विंटल कापूस खरेदी करता आला. शासनाची कापूस उत्पादकांप्रतीची उदासिनताच याला कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.खासगी व्यापाºयांकडून मात्र शेतकºयांची सर्रास लूटपांढरकवडा : येथील खासगी बाजार समितीत कापसाची खरेदी सुरू असून याठिकाणी खासगी व्यापाºयांकडून शेतकºयांची प्रचंड लूट सुरू आहे. खासगी व्यापाºयांचीच बाजार समिती असल्यामुळे हे व्यापारी प्रति क्विंटलमागे २०० ते ३०० रूपयांची शेतकºयांची सर्रास लूट करीत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत खासगी व्यापाºयांनी कापूस खरेदी न करता आपल्या खासगी बाजार समितीत कापूस खरेदी करणे सुरू केले आहे. कोणाचेही नियंत्रण नसलेल्या या खासगी बाजार समितीत व्यापारी मनमानी करीत आहेत. लिलावाच्या वेळी एक भाव तर गंजीवर कापूस खाली करताना दुसरा भाव, असा प्रकार सर्रास सुरू आहे. याशिवाय आद्रतेच्या नावाने कट्टीदेखिल घेतल्या जात आहे. शेतकºयांची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट सुरू असतानाही या गंभीर बाबीकडे कुणाचेही लक्ष जात नाही. क्विंटलमागे १५० ते २०० रूपये भाव गंजी खाली करताना हे व्यापारी देत असल्यामुळे शेतकºयांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. कापसाचा पहिला वेचा हा अतिशय चांगला कापूस असून या आद्रतेच्या नावावर हे व्यापारी शेतकºयांची लूट करीत असताना राजकीय नेते, शेतकरी नेते मात्र मुग गीळून आहेत. खासगी व्यापारी हमी भावानसेुद्धा कापूस खरेदी करीत नसून त्यांची मनमानी सुरू आहे. त्यामुळे कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडियाची कापूस खरेदी त्वरित सुरू होणे आवश्यक आहे.
वणीत सीसीआयचे पारडे रिकामेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 9:46 PM
शासनाची अधिकृत एजन्सी असलेल्या सीसीआयला ‘खो’ देत वणी परिसरातील कापूस उत्पादकांनी आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकणे सुरू केले आहे.
ठळक मुद्देकेवळ ७९ क्विंटल खरेदी : व्यापाºयांनी खरेदी केला ७० हजार क्विंटल कापूस