यवतमाळ : लोकमत-समाचार-टाइम्स सखी मंच यवतमाळच्यावतीने १२ आॅगस्ट रोजी येथील दर्डा मातोश्री सभागृहात नि:शुल्क विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे. दुपारी ३ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. रव्यापासून गोड पदार्थ तयार करणे, मक्यापासून तिखट पदार्थ तयार करणे, राखी तयार करणे आदी स्पर्धांचा यामध्ये समावेश आहे. रव्यापासून पदार्थ तयार करताना जास्तीत जास्त रव्याचा उपयोग करावा लागणार आहे. सजावटीसाठी खाद्यपदार्थ वापरायचे आहे. कृत्रिम वस्तूचा वापर करता येणार नाही. पदार्थ घरूनच तयार करून आणावे लागणार आहे. सजावटीसाठी १० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. पदार्थामध्ये चव, निटनिटकेपणा, सजावट आदी बाबींना गुण दिले जाणार आहे. विजयी स्पर्धकांना प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वस्तू रूपात दिले जाणार आहे. राखी बनविण्याची स्पर्धा राखी बनविण्यासाठी लागणारे साहित्य घरून आणावे लागेल. राखीचा आकार १० रुपयांच्या नाण्याऐवढा असावा. राखी तयार करण्यासाठी कोणत्याही वस्तूंचा वापर करता येईल. यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाईल. आकर्षक रंगसंगतीला गुण दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या प्रकल्प अधिकारी अलका राऊत, शुभदा हातगावकर, स्मिता गंधे या आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लोकमत सखी मंच संयोजिका सिमंतीनी पडाळकर यांच्याशी (९६८९८८६८६२) यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत सखींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केली आहे. (उपक्रम प्रतिनिधी) (उपक्रम प्रतिनिधी)
सखी मंचच्यावतीने आज नि:शुल्क विविध स्पर्धा
By admin | Published: August 12, 2016 2:14 AM