ढाणकी : उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या संकल्पनेतून येथे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना खतांच्या बॅगांचे वाटप करण्यात आले.
येथील उपबाजार सभागृहात रमण पाटील रावते, माजी पंचायत समिती सभापती खाजाभाई कुरेशी, जिनिंग प्रेसिंग संचालक बाबूराव नरवाडे, शिवसेना शहरप्रमुख बंटी जाधव, भाजप शहराध्यक्ष रोहित वर्मा, वंचित बहुजन आघाडी प्रशांत विणकरे, उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख मौला, किशोर ठाकूर, सुभाष कुचेरिया, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण जैन, नगरसेवक संबोधी गायकवाड, बाजार समिती संचालक बंडू कोडगीवार, दत्तराव रावते पाटील, गजानन बोन्सले, सोसायटी अध्यक्ष अशोक कुंबरवार यांच्या उपस्थितीत हमाल तथा रिक्षाचालकांना घोंगडीचे वाटप करण्यात आले.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे खुले प्रांगण, नवीन बसस्टँडजवळ, अहिल्याबाई चौक येथे बाळासाहेब चंद्रे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यशस्वितेसाठी बाळासाहेब मित्र मंडळाचे कार्यकर्ते रूपेश भंडारी, सचिन तोटेवाड, अविनाश पांडे, अमोल तुपेकर, बंटी वाळके आदींनी परिश्रम घेतले. संचालन नागेश महाजन यांनी केले.