यानिमित्त १६ ते २२ ऑगस्टपर्यंत श्री धाम वृंदावन जि.मथुरा (उत्तर प्रदेश) येथे भक्तिमय शिव महापुराण अयोजित केली होती. प्रसिद्ध कथा प्रवक्ता श्रध्ये अरविंदजी शास्त्री महाराज यांच्या अमृतवाणी संपन्न झाली. २३ ऑगस्टला महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. २४ला रामचरित्र मानस ‘सुंदरकांड’ संध्या आयोजित करण्यात आली. रामायण मंडल पांढरकवड़ा यांच्या मधुर वाणीने जगदंबा निवास येथे हा कार्यक्रम पार पडला. २५ला ब्राह्मण भोज, दान दक्षिणा, यज्ञ हवन, तृतीय पंथ यांचा भक्तिमय भंजन, सत्कार, भोजन, दान दक्षिणा आणि अग्रेसन भवन येथे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकनेते अण्णासाहेब पारवेकर, श्रध्ये योगेशजी महाराज, राज्यमंत्री किशोर तिवारी, त्रिंबक, घोडाम, गजानन बेजंकीवार, वासुदेवजी शेंद्रे, जानू गिलानी, सऊद कुदुस अब्दुल कुदुस, दामोदर बाजोरिया, विक्रम मायी, शंकर बडे, अनिल खोड़के, मोहन मामीडवार, गणेश सिंघानिया, मनोज जैसवाल, विजय कोंडुलवार, दीपक कापर्तिवार, चित्रा वाघ, पाटणकर आदी उपस्थित होते. रजनीकांत बोरेले यांनी आभार मानले. लक्ष्मीकांत बोरेले, चंद्रकांत बोरेले, अजय बोरेले, शिवम बोरेले, शुभम बोरेले, विक्रांत बोरेले यांनी सहकार्य केले.
पांढरकवडात विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:39 AM