शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:35 AM

वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील नऊ प्रयोगशील शेतकरी व एका कृषी शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑगस्टला येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१८ ऑगस्टला वितरण पुसद येथे कार्यक्रमाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील नऊ प्रयोगशील शेतकरी व एका कृषी शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑगस्टला येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ४० व्या स्मृतीदिनी १८ ऑगस्टला दुपारी १२.१५ वाजता वसंतराव नाईक ‘कृषी गौरव पुरस्कारा’चे वितरण केले जाणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरु डॉ.चारूदत्ता माई राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ.आशीष पातुरकर उपस्थित राहणार आहे. यानंतर दुपारी ३.१५ वाजता ‘दुग्ध प्रक्रिया आणि मूल्यवर्धन’ या विषयावर कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचे अनुभव कथन होणार आहे.याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान समितीचे स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी.हिराणी, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक, विजय पाटील चोंढीकर, अविनाश नाईक, प्रा.गोविंद फुके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार असल्याचे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी, कोषाध्यक्ष जय नाईक, सचिव प्राचार्य डॉ.उत्तम रुद्रवार आदींनी कळविले आहे.पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची नावेकोकण विभाग :- अनुभव शरद मांजरेकर मु. बदलापूर, जि. ठाणे (उन्हाळी झेंडू), डॉ. संदीप चोपडे संगमेश्वर जि. रत्नागिरी (वनशेती, बांबू). पश्चिम महाराष्ट्र :- अशोक दशरथ भाकरे, मु. धामोरी जि. अहमदनगर (फळभाजी, रोपवाटिका), अतुल सोपानराव तांबे, मु. तांबेवाडी जि. अहमदनगर (विक्रमी कांदा उत्पादन). विदर्भ :- किशोर खिरूसिंग राठोड, मु. काटखेडा जि.यवतमाळ (दुग्ध व्यवसाय), दादाराव जनार्दन घायर, मु. ब्राम्हणवाडी थडी, जि. अमरावती (विक्रमी केळी उत्पादन), राहुल गणेशराव रौंदळे, मु. निमखेडबाजार जि. अमरावती (विक्रमी सीताफळ उत्पादन). मराठवाडा :- मेघा विलासराव देशमुख, मु. झरी जि. परभणी (विक्रमी पेरू उत्पादन), अभिजीत मदनराव वाडेकर, मु. मंगुजळगाव, जि. जालना (विक्रमी कारले उत्पादन). कृषी शास्त्रज्ञ :- प्रा.डॉ.राजेश्वर रामदास शेळके.

टॅग्स :Vasantrao Naikवसंतराव नाईक