लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.शहरचे ठाणेदार प्रमेश आत्राम यांनी गेल्या १५ दिवसांपूर्वी वाहतुकीला अडथळा होतो म्हणून भाजीपाला व फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या हटविल्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला. तेथे आता शहर पोलीस ठाण्याचे मोठे वाहन आणून उभे केले जाते. तसेच तेथे इतरही वाहने उभी राहतात. त्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा होत नाही कां, आम्ही हातगाडी लावली तरच वाहतुकीला अडथळा निर्माण होतो का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी विचारला आहे.शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करून दुकाने थाटण्यात आली. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. मग आमच्यावरच अन्याय का, असा त्यांचा प्रश्न आहे. उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याच ठिकाणी हातगाडी लावण्याची किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना झाली नाही.१४ आॅगस्टपासून २२ भाजी व फळ विक्रेते साखळी उपोषणाला बसले आहे. जोपर्यंत त्याच ठिकाणी किंवा पर्यायी जागा मिळत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार विष्णू सरकटे, विलास उबाळे, सै.सलीम, मनसूर शेख, शेख अनसार, गणेश खाडे, शेख जावेद, सै.मुजिबोद्दीन, साकीब अहेमद, शेख जाकीर, अशोक चोपडे, शेख ईसराईल, रुकमाबाई सुकळकर, मंदाबाई चोपडे, यांच्यासह सर्वच भाजी व फळ विक्रेत्यांनी केला आहे.खुल्या जागेतील वाहनांचा अडथळा नाही का ?पोलिसांनी भाजीपाला व फळविक्रेत्यांना हटवून जागा खुली केली. त्याच जागी आता पोलिसांच्या वाहनासह इतर वाहने उभी राहतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत नाही का, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी केला आहे. शिवाय शहरात इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून दुकाने थाटली. ही दुकाने का हटविली जात नाही, असा संतप्त प्रश्न उपोषणकर्त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. विशेष म्हणजे शहरातील अनेक चौकात अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याकडे पोलीस सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. केवळ गरिबांच्याच व्यवसायावर घाला का घातला जातो, असा प्रश्न उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला.
पुसद येथे भाजीपाला, फळविक्रेत्यांचे शहर पोलीस ठाण्यासमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 10:33 PM
येथील शिवाजी चौकात गेल्या २0 वर्षांपासून भाजीपाला व फळ विक्रेते व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र १५ दिवसांपूर्वी त्यांच्या हातगाडी शहर पोलिसांनी हटविल्या. त्यामुळे त्यांनी शहर पोलीस ठाण्यासमोरच आमरण उपोषण सुरू केले आहे.
ठळक मुद्देपाचवा दिवस । प्रशासनाकडून अद्यापही दखल नाही, पर्यायी जागा देण्याची अपेक्षा