लोकमत न्यूज नेटवर्कवणी : रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.प्रतिसेंकद ५०० घनमिटरने बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वणी तालुक्यातील नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सन २००७ मध्ये वणी उपविभागात भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे तशीच परिस्थिती तर निर्माण होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.गेल्या २४ तासांत वणी तालुक्यात ६२.३७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत या तालुक्यात ५६५.११ मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली. सततच्या पावसामुळे या भागातून वाहणाऱ्या नद्या फुगल्या असून त्यातच गुरूवारी सकाळी बेंबळा धरणाचे नऊ व दुपारनंतर ११ असे एकूण २० दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणी तालुक्यातून वाहणाºया वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. ही बाब लक्षात घेऊन महसूल प्रशासनाने वर्धा नदी काठावरील रांगणा, कोना, उकणी, विरूळ, मुंगोली, माथोली, साखरा कोलगाव, जुगाद आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाची संभाव्य परिस्थितीवर करडी नजर असून त्यादृष्टीने यंत्रणा सज्ज केली आहे.शेतीचे नुकसान : संयुक्त सर्वेक्षणाला प्रारंभवणीसह तालुक्यासह मारेगाव, झरी तालुक्यात संततधार पावसामुळे हजारो हेक्टर शेती बाधित झाली आहे. वणी तालुक्यात २८८९ हेक्टर शेती बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी व महसूल विभागाने व्यक्त केला आहे. मात्र महसूल विभाग, कृषी विभाग व पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची यंत्रणा संयुक्त सर्वेक्षणाला लागली असून झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने जिल्हाधिकाºयांना सादर केला जाणार आहे. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे सर्वेक्षण करणार असून त्यांना सरपंच व पोलीस पाटील सहकार्य करतील, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी ‘लोकमत’ला दिली.रांगणालगतच्या नाल्यावर युवकाचे प्राण वाचलेगुरूवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास वडगाव-रांगणा मार्गावरील एका नाल्यावर आलेल्या पुरात वाहून जाणाºया युवकाचे सतर्क नागरिकांनी प्राण वाचविले. राजू पंढरी निबुदे (३६) असे युवकाचे नाव असून तो रांगणा येथील रहिवासी आहे. गुरूवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास राजू रांगणा मार्गावरील नाला पार करत असताना तो पाय घसरून प्रवाहात पडला. ही बाब नाल्याच्या दोन्ही काठावर उभ्या असलेल्या नागरिकांच्या लक्षात येताच, धाव घेऊन त्याला प्रवाहाबाहेर काढले.बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन संबंधित तहसीलदारांना त्या-त्या भागात यंत्रणेला सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदी काठावरील गावांत दवंडी देऊन नागरिकांना सतर्क करण्याबाबतही सांगण्यात आले आहे.- प्रकाश राऊत, उपविभागीय अधिकारी, वणी
वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:05 PM
रविवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस गुरूवारी पाचव्याही दिवशी सुरूच असून त्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बेंबळा धरणाचे २० दरवाजे उघडण्यात आल्याने वर्धा नदीतील पाण्याची पातळी वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देबेंबळाचे २० दरवाजे उघडले : पूर परिस्थिती बिकट होण्याची भीती