लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे.रस्ता रूंदीकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे. यासाठी काही लोकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. जागा रिकामी करून देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या मार्गावर मागील ३५ ते ४० वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या लोकांची घरेही पाडली जाणार आहे. ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेचा कर भरणा नियमितपणे भरणाऱ्या लोकांचाही यात समावेश आहे. या कुटुंबातील मुले जवळच्या शाळेमध्ये आहे. घरे पाडून इतर ठिकाणी जायचे झाल्यास अनेक प्रश्न निर्माण होणार आहे. तत्पुर्वी जायचे कुठे ही समस्या गंभीर आहे. त्यामुळे जमीन संपादित करण्यापूर्वी आणि घरांवर बुलडोजर चालविण्यापूर्वी पर्यायी व्यवस्था करून द्यावी, अशी मागणी या नागरिकांनी केली आहे. योग्य जागा आणि मोबदला न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर रामकला सिडाम, रत्नमाला कन्नाके, कमल आठवले, शकुंतला पोयाम, सुलोचना मसराम, रत्नकला ठोकळ, बेबीताई परचाके, चंद्रभान पोयाम, तुळशीदास घोडसाट, रवींद्र शिंदे, सुधाकर हटवार, सुभाष वानखडे, सुनील खताडे, विनायक कुडमेथे, धनंजय मानकर, राजू रोकडे, युसुफ पठाण, महादेव तपासे आदी नागरिकारंच्या स्वाक्षºया आहेत.
लोहारा-वाघापूर बायपासवरील गरीबांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:22 AM
रस्ता रूंदीकरणासाठी राहती घरे पाडली जात असल्याने पर्यायी जागेसाठी लोहारा-वाघापूर बायपासवरील नागरिकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा तसेच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे.
ठळक मुद्देरस्त्यासाठी छत हिरावणार : पर्यायी जागा व मोबदल्यासाठी निवेदन