शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:25 AM

यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले.

ठळक मुद्देकर्जमाफीनंतरही धग कायम

ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. जिल्ह्यात झालेल्या या दोन शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण राज्य हादरुन गेले. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. तर अनेक शेतकरी हातात विषाचा प्याला घेऊन फिरत आहे. त्यांना वेळीच सावरले नाही तर मृत्यूचे तांडव असेच सुरू राहणार.यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा. शेकडो शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्या. शासन बदलले, प्रशासन गतिमान झाले, विविध शासकीय योजना आल्या. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडला नाही.कोट्यवधींच्या योजना आणि पॅकेज येऊनही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत त्याचा लाभच गेला नाही. अलिकडेच शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी दिली. मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव शोधत आहे. आपल्या बरोबरीच्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहे. आपलेच नाव का नाही, अशातूनही शेतकरी निराश होत आहे.घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या नावे थेट चिठ्ठी लिहून आपल्याला कर्जमाफीचा फायदा झाला नाही, त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका कुटुंबाने घेतल्याने तीन दिवस मृतदेह शवागारात होता. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने सोपस्कार पार पाडले.कुटुंबियांची समजूत काढण्यात यश मिळविले. शंकरची चिता धगधगत असताना उमरखेडच्या इवळेश्वर येथील माधव रावते यांनी स्वत:च सरण रचून आत्महत्या केली. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या या वृद्धावर आयुष्याच्या सायंकाळी अशी दुर्दैवी वेळ आली. दोन दिवसानंतर या आत्महत्येला वाचा फुटली. शासन-प्रशासन हादरुन गेले.जिल्ह्यात शंकर आणि माधव सारखे अनेक शेतकरी आहे. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईनच्या जाचातून आणि विविध प्रक्रियेतून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने दिलेली कर्जमाफीतील त्रुटी आता शेतकऱ्यांच्या जीवावर तर उलटत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या