रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : स्वातंत्र्य लढ्याची ठिणगी ज्या आझाद मैदानातून पेटविली गेली. घाणीच्या साम्राज्याने त्या आझाद मैदानाचे पावित्र्य संपुष्टात आणले आहे. या ठिकाणचा विजयस्तंभही गटाराने वेढला गेला आहे. यामुळे स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या हुतात्म्यांना या ठिकाणचे वातावरण पाहून प्रचंड वेदना होत असेल.महात्मा गांधीनी मिठाचा सत्याग्रह याच मैदानात केला होता. त्यावेळी एका भल्यामोठ्या कढईत मीठ ओतून स्वातंत्र्य लढ्यातील आंदोलनाचे बिगूल फुंकण्यात आले होते. त्यावेळी ब्रिटिशांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे या ठिकाणच्या चौकाला पाच कंदील चौक असे नावही पडले होते.या आझाद मैदानात महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लोकनायक बापूजी अणे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या सभा झाल्या आहे. त्यावेळी स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीचे केंद्र बिंदू आझाद मैदानच होते. या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºया शहिदांची नावे विजयस्तंभावर कोरण्यात आली आहे.नगरभवनाच्या परिसरात हे स्तंभ आजही साक्ष देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे प्रतीक म्हणून मध्यभागी विजयस्तंभ दिमाखात उभा आहे. या विजयस्तंभाचे सौंदर्यीकरण करण्यात आले. यानंतर हा विजयस्तंभ बेवारस पडून आहे. या स्तंभाजवळ प्रचंड घाण साचली आहे. क्रांतीदिनीही असेच चित्र या ठिकाणचे होते. १४ आॅगस्टच्या सायंकाळी अशीच स्थिती होती. गटाराचे लोट विजयस्तंभाच्या भोवताली होते. या मैदानात चहू बाजूने कचराच कचरा आहे.केवळ १५ आॅगस्ट, २६ जानेवारीलाच आठवणया ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. मात्र नगरपरिषद प्रशासनाचे या ठिकाणाकडे दुर्लक्ष झाले आहे. हे ठिकाणी एखाद्या पोडावरील मैदानासारखे बेवारस असल्याचे दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते. २६ जानेवारी, ९ आॅगस्ट आणि १५ आॅगस्ट या दिवशीच या ठिकाणावर स्वच्छतेकडे लक्ष केंद्रीत केले जाते. यानंतर या ठिकाणाकडे ढुंकूनही पाहिले जात नाही.
आझाद मैदानातील विजयस्तंभ घाणीच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 9:45 PM