शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

शल्यचिकित्सकांची विदर्भस्तरीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:27 PM

वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅन्युअल कॉन्फरन्स आॅफ विदर्भ सर्जन असोसिएशनची परिषद आयोजित करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या परिषदेत देशपातळीवरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देआमटे दाम्पत्याची उपस्थिती : ३४ शस्त्रक्रियेतून प्रत्यक्ष मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅन्युअल कॉन्फरन्स आॅफ विदर्भ सर्जन असोसिएशनची परिषद आयोजित करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या परिषदेत देशपातळीवरच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करून मार्गदर्शन केले. विदर्भातील ४०० शल्यचिकित्सकांनी सहभाग घेतला.शल्यचिकित्सकांच्या विदर्भस्तरीय परिषदेचे आयोजन करण्याचा बहुमान यवतमाळला पहिल्यांदाच मिळाला. ‘व्हॅसकॉन-२०१८’ या परिषदेचे उद्घाटन पद्मश्री डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. एएसआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दिलीप गाडे, आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अशोक अढावू उपस्थित होते. विदर्भ सर्जन असोसिएशनच्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळाही झाला.दिल्ली येथील डॉ.सभ्यसाची बल, डॉ.भाऊ हाडके, प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.रॉय पाटणकर, डॉ.समीर रेघे, डॉ.प्रशांत भांडारकर, डॉ.चिवटे, नागपूर येथील डॉ.राज गजभिये, डॉ.राहाटे, डॉ.मुकुंद ठाकूर, डॉ.अजय बोराळकर, डॉ.सतीश धारप, डॉ.निर्मल पटले, डॉ.लक्ष्मीकांत लाडूकर, डॉ.गोविंद कोडवाणी यांनी विद्यार्थ्यांना लठ्ठपणासाठीची शस्त्रक्रिया, तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया, हर्निया, अन्ननलिकेची शस्त्रक्रिया, दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया, मूळव्याध शस्त्रक्रिया, लेझरद्वारे शस्त्रक्रिया अशा विविध प्रकारातील २५ शस्त्रक्रिया करण्यात आल्या.कार्यशाळेसाठी अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार, विभाग प्रमुख डॉ.गिरीष जतकर यांनी पुढाकार घेतला. यावेळी शहरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ.नारायण तावडे, डॉ.दामोदर बाहेती, डॉ.एम.एम. अग्रवाल, डॉ.सुहास श्रोत्री यांचा सत्कार करण्यात आला. परिषदेच्या आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष डॉ.गिरीष जतकर, सचिव डॉ. अमोल देशपांडे, कार्याध्यक्ष डॉ. आशीष तावडे यांच्यासह सहायक प्राध्यापक डॉ. विजय पोटे, डॉ.सुरेंद्र भुयार, डॉ. विनोद राठोड, डॉ.अशोक चौधरी, डॉ. विजय कावलकर, डॉ.हेमंत म्हात्रे, डॉ. राजा कडूकार, डॉ.निशांत चव्हाण, डॉ. विजय कनाके, डॉ.स्वप्नील मदनकर, बधिरीकरण विभाग प्रमुख डॉ. दामोधर पटवर्धन यांनी परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्रपरिषदेत पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र व कार्यशाळा घेण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयातील शल्यचिकित्सा विभाग व विदर्भ सर्जरी असोसिएशन, सर्जन आॅफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.

टॅग्स :doctorडॉक्टर