शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

विदर्भाच्या पांढऱ्या सोन्याची परवड

By admin | Published: October 30, 2014 10:59 PM

विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून ज्याची ओळख आहे त्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची फेडरेशनच्या छुप्या अजेंड्यामुळे चांगलीच परवड सुरू आहे. महासंघाने यावर्षी अद्यापही कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही.

महागाव : विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून ज्याची ओळख आहे त्या कापूस उत्पादक शेतकऱ्याची फेडरेशनच्या छुप्या अजेंड्यामुळे चांगलीच परवड सुरू आहे. महासंघाने यावर्षी अद्यापही कापूस खरेदीचा शुभारंभ केला नाही. खासगी व्यापाऱ्यांनी ही संधी साधून मनमानी भावात खरेदी सुरू केली आहे. महासंघाने तीन हजार ८०० रुपये भाव कापसाला देवू केला असून कापसाच्या प्रतवारीतून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी केली जात आहे. राज्यात राजकीय बदल होताच पणन महासंघावर भारतीय जनता पार्टीमधील काही नवीन चेहऱ्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. पुसद येथील विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे पराभूत उमेदवार व खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष, उमरखेडचे माजी आमदार व भाजपचे कट्टर कार्यकर्ते यांची नावे यामध्ये आघाडीवर आहेत. विदर्भाचं पांढरं सोनं म्हणून कापसाला दर्जा मिळाला आहे. त्या पांढऱ्या सोन्याची राज्यात व त्यातही विदर्भात चांगलीच परवड सुरू आहे. हक्काचे आणि प्रगतीचे पीक म्हणून कापसाचे उत्पादन विदर्भात सर्वाधिक घेतले जाते. कापसाच्या विविध जाती याच विदर्भातील शेतकऱ्यांनी रुजविल्या आहेत. बीटी कॉटन असो की अन्य बीटीच्या जाती, अनेक आव्हानात्मक कापसाची लागवड विदर्भातील शेतकऱ्यांनी करून कापसातील विविध उत्पादनाबाबत वेगवेगळे विक्रम केले आहेत. अंबोडा येथील प्रगतिशील शेतकरी अमृतराव देशमुख यांनी तर कपाशीच्या आगळ्यावेगळ्या लागवडी पद्धतीमधून घेतलेले उत्पादन राज्यातच नव्हे तर गुजरात सरकारमध्येसुद्धा कौतुकास पात्र ठरले आहे. अमृत पॅटर्न म्हणून त्यांच्या नावाने कपासीचे बियाणे देखील बाजारात आता उपलब्ध झाले आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करून कापसाचे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना आधार वाटवा म्हणून राज्यात कापूस उत्पादक पणन महासंघाची निर्मिती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची बाजारपेठ आणि भाव देण्यामध्ये फेडरेशनचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून फेडरेशनची कापूस खरेदी म्हणजे वरातीमागून घोडे अशी अवस्था झाली आहे. कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन.पी. हिराणी हे वैदर्भीय सुपुत्र असून देखील त्यांच्या कार्यकाळात फेडरेशनला उतरतीच कळा लागल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. हजारो कर्मचाऱ्यांचा डोल्हारा आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेला पणन महासंघ अखेरच्या घटका मोजत असल्यागत दिसून येत आहे. फेडरेशनवर अवलंबून असलेल्या खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि जिनिंग सहकारी संस्था चांगल्याच डबघाईस आल्या आहेत. डॉ. एन.पी. हिराणी हे कुशल प्रशासक असतानासुद्धा विदर्भाच्या कापसाला ते आवश्यक त्या उंचीवर अद्याप नेवू शकले नाही. गेल्या १२ वर्षांपासून फेडरेशनची निवडणूकच झाली नाही. आता मात्र राज्यात सत्तेची खांदेपालट झाली असून विदर्भात आणि त्यातही पुसदला न्याय द्यायचा झाल्यास नवीन व्यक्तीची चाचपणी सुरू झाली आहे. हा व्यक्ती भाजपाचा आणि त्यातही पुसद तालुक्यातीलच असावा असा प्रयत्न असल्यामुळे पुसदच्या तीन लोकांचे नाव यामध्ये आघाडीवर आहेत. (शहर प्रतिनिधी)