कळंब : नांझा येथे ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. प्र. मा. रुईकर ट्रस्ट शाळेचे शिक्षक, विद्यार्थी या अभियानात सहभागी झाले होते. आमदार डॉ. अशोक उईके यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. यामध्ये महिला, विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग होता. आमदार उईके यांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. प्र. मा. रुईकर ट्रस्टचे व्यवस्थापकीय संचालक उदय नावलेकर, विश्वस्त राजन टोंगो, मुख्याध्यापक भुमन्ना बोमकंटीवार, सरपंच ताई बुरबुरे, रामदास आत्राम, विनोद आत्राम, किशोर वासेकर, सुधाकर मुके, किशोर सलामे, आनंद चौधरी, दीपक बरडे, अमोल देवघरे, नारायण मुके, अनुप डंभारे आदी उपस्थित होते. वाटर कप पाणी फाऊंडेशनच्यावतीने सुरु असलेल्या स्पधेअंतर्गत या गावालगतच्या नाल्यावर बंधारा व जलसंधारणाच्या कामाला सुरुवात झाली. आमदार डॉ. अशोक उईके यांनी या कामाचा शुभांरभ केला. नांझाच्या आपादग्रस्तांना मदत येथील रामदास आत्राम व विनोद आत्राम यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्या जीवनाची पुंजी बेचीराख झाली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. अशा कुंटुंबाला अत्यावश्यक वस्तू, धान्य व किराणा साहित्याचे वाटप आमदार डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले. यासाठी प्र.मा. रुईकर ट्रस्टने पुढाकार घेतला. (तालुका प्रतिनिधी)
नांझा येथे ग्रामस्वच्छता अभियान
By admin | Published: May 01, 2017 12:17 AM