येथे पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. इतर ठिकाणी काय निर्णय व्हायचा तो होईल, परंतु दिग्रस विधानसभा मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष सैय्यद फारूक सय्यद करीम होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, नेर तालुकाध्यक्ष विनायक भेंडे, दिग्रस तालुकाध्यक्ष शंकरराव जाधव, जाफर खान, ज्ञानेश्वर बोरकर, पंढरीनाथ सिंहे, मनमोहनसिंग चव्हाण, गुलाबराव राठोड, जगन पाटील, रघुनाथ जाधव, प्रेम राठोड, नानासाहेब ढोंगे, पंढरीनाथ गुल्हाने, सुभाष पवार, ज्ञानेश्वर कदम, धर्मेंद्र दुधे, सलीम सोलंकी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माणिकराव ठाकरे यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत महसूल मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सैय्यद फारुक, राहुल ठाकरे, ज्ञानेश्वर बोरकर, मनमोहनसिंग चव्हाण, पंढरीनाथ सिंहे, सिद्धार्थ गडपायले, दिनेश नरवडे, ज्ञानेश्वर कदम, रमेश पजगाडे,रमेश आडे, प्रमोद लोंढे,चंदू बिबेकर, गोलु कानकीरड यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन गणेश म्हातारमारे यांनी, प्रास्ताविक तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे यांनी केले तर आभार रामधन जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला विश्वास ठाकरे, राजेंद्र घाटे, नंदकुमार ठाकरे, अतुल राऊत, प्रभाकर गुल्हाने, गजानन नवदुर्गे, अरूण शिंदे, लक्ष्मणराव खाडे, रमेश ठक, ज्ञानेश्वर खोडे, गजानन बिबेकर, मतीन शेख, उत्तम गोमासे, अशोक देशमुख, रामहरी गांवडे, विष्णू शिंदे, वसंत सवाई, प्रकाश देशकरी, महादेव भोयर, भाऊ सुळे, विजय गोकुळे, अ. जावेद, मुसब्बीर खान, अलीमहंमद सोलंकी, इम्रान हक, विठोबा कंसबे, राजू लाड, सचिन कापडे, राजू चवात, राजू अवचट, अमोल खोडे, अरूण नांदेकर, जमन काझी, कैलास साबळे, महेमुद अली, अनिल लोथे, भास्कर ठाकरे, अमोल चौधरी, निलेश बोरकर, अनिल मोहिते, राहूल चेटुले, शरद लोथे, केशव खोडे, गुलाब चव्हाण, कैलास कटके, अजाबराव पवार, बद्री राऊत, गोविंद नवरंगे, सतीश बागल, राजू राठोड आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
बॉक्स
मेळाव्यात युवकांना मनोगताची संधी
या मेळाव्यात जिल्हा सचिव पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विजय पाचकोर, दिलीप चौधरी यांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनेक युवकांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसमध्ये बदल होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.