लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : झारखंडमध्ये जमावाने एकत्र येऊन एका निरपराध व्यक्तीची हत्या केली. मॉबलिंचींगच्या या घटनेविरोधात सोमवारी उमरखेडमध्ये हिंसक पडसाद उमटले. हत्येचा निषेध करीत उमरखेडमध्ये निघालेला मोर्चा काही वेळातच अनियंत्रित झाला. मोर्चेकऱ्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक केली. अखेर व्यापारी व नागरिकांनीही पोलीस ठाण्यात धाव घेऊन मोर्चेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. झारखंडमधील हिंसेची प्रतिक्रिया म्हणून उमरखेडमध्येही हिंसक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.सोमवारी सकाळी १० वाजता येथील मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी मॉबलिचिंग घटनेच्या विरोधात शहरातून जनआक्रोश मोर्चा काढला. सुरुवातीला शांततामय पद्धतीने निघालेला मोर्चा बसस्थानकासमोर आल्यावर अनियंत्रित झाला. मोर्चातील काही जणांनी दुकानांवर दगडफेक करणे सुरू केले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांची नासधुस केली. या दगडफेकीत काही दुकानांच्या काचा फुटल्या. तर काही जण जखमीही झाले. मोर्चेकºयांचा हा प्रताप अवघ्या काही क्षणात गावभर कळला आणि काही मिनिटांच्या आत संपूर्ण शहरातील बाजारपेठ बंद झाली. वातावरण तणावपूर्ण बनले. सर्व व्यापाºयांनी आणि नागरिकांनी दगडफेक करणाºयांना अटक करण्याची मागणी करीत पोलीस ठाण्यापुढे ठिय्या आंदोलन केले.शहरातील नागरिक व व्यापाºयांच्या संतप्त भावना पाहता मोर्चा आयोजकांपैकी आठ जणांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तेथील अधिकाºयांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी आठ आयोजकांना अटक केली. यामध्ये सै. इरफान सै. युसुफ, शेख जलील अहेमद उस्मान, एजाज खान इब्राहीम खान, महंमद सिद्दीकी शेख मोईनोद्दीन, मुजीबुर अ. रहेमान, तालिब अहमद शेख मुख्तार, सै. अन्सार सै. अहेमद, सै. अफसर सै. कासम यांचा समावेश आहे. यासह ३० ते ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहे.चार कामगार दगडफेकीत जखमीमोर्चा तहसीलकडे जात असताना बसस्थानकालगतच्या दुर्गा बिकानेर हॉटेलसमोर येऊन काही मोर्चेकºयांनी जबरदस्तीने दुकान बंद पाडले. त्यानंतर मोर्चातील ३० ते ३५ जणांनी दगडफेक सुरू केली. यात प्रदीप पत्तेवार यांचे साईनाथ अप्लायन्सेस, गिरीराज ड्रेसेस, अंबा लॉज, करूणेश्वर हार्डवेअर, लक्ष्मी भोजनालय या दुकानांवर दगडफेक झाल्याने काचा फुटल्या. यातील कामगार शैलेश सावंत, बाळू कलाने, संतोष भोयर, विजय माने हे चौघे जखमी झाले.महागाव, बिटरगाव, दराटी, पोफाळीचे पोलीस पोहोचलेबंदोबस्तासाठी बिटरगाव, दराटी, पोफाळी, महागाव येथील पोलीस कर्मचारी उमरखेड शहरात दाखल झाले होते. मोर्चा आयोजकांनी स्वत: अटक करवून घेतल्याने तणाव थोडा कमी झाला. ज्या ठिकाणी गोटमारीची घटना झाली, त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार अनिल किनगे त्वरित पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांच्या आवाहनावरून बाजारपेठ व्यापाºयांनी पूर्ववत सुरू केली. दरम्यान अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी भेट देऊन सूचना दिल्या. सायंकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी उमरखेड गाठून आढावा घेतला.
उमरखेडच्या मोर्चाला हिंसक वळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 9:42 PM
झारखंडमध्ये जमावाने एकत्र येऊन एका निरपराध व्यक्तीची हत्या केली. मॉबलिंचींगच्या या घटनेविरोधात सोमवारी उमरखेडमध्ये हिंसक पडसाद उमटले. हत्येचा निषेध करीत उमरखेडमध्ये निघालेला मोर्चा काही वेळातच अनियंत्रित झाला. मोर्चेकऱ्यांनी शहरातील दुकानांवर दगडफेक केली.
ठळक मुद्देआयोजकांना अटक : दुकानांवर दगडफेक, वाहनांची नासधूस