अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ब्रिटिश राजवटीचा तो काळ. यवतमाळातही इंग्रजी गुलामीविरुद्धचे वारे जोरात होते. पण अस्पृश्यांना इंग्रजांबरोबरच अडाणीपणाच्या गुलामीनेही जखडून ठेवले होते. त्यांच्या मानगुटीवरून निरक्षरतेचे साखळदंड भिरकावून देण्यासाठी शेवटी ‘विठ्ठल’ पावला. अस्पृश्यांच्या लेकरांना जेऊ घालणाºया या विठ्ठलाने यवतमाळात चोखामेळा वसतिगृह सुरू केले. आज ९५ वर्षांचा दीर्घ प्रवास करीत हे वसतिगृह अखंड सुरू असले, तरी स्वातंत्र्यांची फळे चाखणाºया समाजाला आणि शासनाला या ज्ञानकेंद्राकडे ढुंकूनही पाहायला फुरसद नाही.स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक खाणाखुणा यवतमाळात आजही शिल्लक आहेत. श्री चोखामेळा फ्रि बोर्डींग हे वसतिगृह त्यातलेच. पाटीपुºयात राहणारे विठ्ठल दशरथ मकेसर यांनी १९२२ मध्ये त्याची मुहूर्तमेढ रोवली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने ते स्वातंत्र्यासह समाजसुधारणेच्या चळवळीत सहभागी होते. तेव्हा श्रीमंताघरच्या लेकरांनाच शिकवण्याची सोय नव्हती, मग गोरगरिबांच्या पोरांची तर विचारता सोय नव्हती. त्यातही समाजाने अस्पृश्य म्हणून दूर लोटलेल्या पोरांना कोण शिकवणार? म्हणून विठ्ठल मकेसर यांनी गावाबाहेरच्या जंगलव्याप्त जागेत (आजच्या नेताजी नगराजवळ) छोटेसे वसतिगृह सुरू केले.चोखामेळा फ्रि बोर्डींग अशा नावाने सुरू केलेल्या या वसतिगृहात पहिल्या वर्षी ४० पोरं आली. पुढे शंभर-शंभर पोरं राहू लागली. कोणतेही अनुदान नव्हते. विठ्ठल मकेसर दिवसभर गावात फिरून लोकांना धान्य मागायचे. सायंकाळी वसतिगृहात शिजवून पोरांना जेवू घालायचे. हा त्यांचा संघर्ष १९६१ पर्यंत दररोज सुरू होता. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर समाज कल्याण विभागाकडून वसतिगृहाला थोडे अनुदान येऊ लागले आणि जेवणाचा संघर्ष थांबला. पण अवघ्या सहा वर्षांनी १९६७ मध्ये विठ्ठल मकेसर निवर्तले. त्यानंतर त्यांचे सुपूत्र मधुकर मकेसर यांनी हे वसतिगृह आपल्या वडिलांचा वारसा म्हणून सांभाळले. तर १९९१-९२ पासून विठ्ठल मकेसर यांचे नातू प्रवीण मकेसर वसतिगृह सांभाळत आहेत.समाज सुधारकांच्या भेटीस्वातंत्र्यपूर्व काळात विठ्ठल मकेसर यांचे वसतिगृह पाहण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी यवतमाळात भेटी दिल्या. वसतिगृहाची नोंदणी झाल्याच्या दुसºयाच वर्षी ४ जुलै १९२७ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आले होते. अनेक समाजसुधारकांच्या भेटी आणि त्यांचे शेरे वसतिगृहात जपून ठेवलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात यवतमाळ शहर वाढले आणि शहरवासीयांच्या आठवणींचा संकोच झाला. लोक वसतिगृहाला विसरले, पण वसतिगृहाने आपले कर्तव्य सोडले नाही. ते आजही गरिबांच्या पोरांना सांभाळत आहे. आता वेळ आलेली आहे, समाजाने या वसतिगृहाचा सन्मान करण्याची. किमान दारव्हा मार्गाने जाता-जाता या वसतिगृहाच्या लहानच्या फलकावर एक कृतज्ञ नजर टाकण्याची!शकुंतलेचे कौतुक, पण ‘विठ्ठला’चे विस्मरणब्रिटिशकालीन शकुंतलेचे यवतमाळवासीयांना प्रचंड कौतुक आहे. हीच शकुंतला जिथून डुलत डुलत धावते त्या नेताजी नगराजवळच ब्रिटिशांच्या दडपशाहीला चोख प्रत्युत्तर देणारे चोखामेळा वसतिगृह आहे. विठ्ठल मकेसर यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी पदरमोड करून सुरू केलेले हे वसतिगृह आजही अखंड सुरू आहे. शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेलेला हा ठेवा आजही आपल्या शहराचा ऐतिहासिक वारसा म्हणून जपावासा वाटत नाही, हेच दुर्दैव! शकुंतला हळूहळू फास्टट्रॅकवर येतेय, पण चोखामेळा वसतिगृहाची जुनाट इमारत अजूनही त्याच रेल्वेरूळाच्या काठावर तिष्ठत आहे.‘जिन्हे हम गलती से अस्पृश्य मानते हैं, उनकी उन्नती चाहता हूं४महात्मा गांधी यांनी वसतिगृह पाहून नोंदवहीत लिहून ठेवले, ‘जिस को हम गलती से अस्पृश्य मानते हैं, उनकी मैं उन्नती चाहता हूं. इस कारण प्रत्येक अंत्यजगृह प्रती मेरी संमतीही होती हैं.. मोहनदास गांधी’४२३ एप्रिल १९२८ रोजी मदन मोहन मालविय यांनीही ‘महार भाईयों की उन्नती के लिये यह उपकारी कार्य हैं और मैं हृदय से इसकी उन्नती और सफलता का प्रार्थी हूं.’ असे कौतुकोद्गार नमूद करून ठेवले आहेत.४१ नोव्हेंबर १९३२ ला वसतिगृहात वि. दा. सावरकर आले होते. ‘अस्पृश्यातील पोटजातींची सर्व मुले एकत्र जेवत बसले हे पाहून संतोष झाला.’ असा त्यांचा स्वहस्ताक्षरातील शेरा आहे.इथे घडले आमदार अन् शिक्षणाधिकारीपहिली ते दहावीपर्यंतचे २८ विद्यार्थी आजही येथे राहत आहेत. ९५ वर्षांच्या दीर्घ कालावधीत या वसतिगृहाने गरिबाघरच्या अनेक मुलांना मोठे केले. यवतमाळचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी व्ही. बी. पाटील, माजी आमदार अण्णासाहेब खडसे हे याच वसतिगृहात शिकून मोठे झाले. असे अनेक माजी विद्यार्थी आज मुंबई, पुण्यासारख्या शहरात अधिकारी पदावर कार्यरत आहेत.
अस्पृश्यांच्या लेकरांसाठी विठ्ठलाचे ‘चोखामेळा’ वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 11:19 PM
ब्रिटिश राजवटीचा तो काळ. यवतमाळातही इंग्रजी गुलामीविरुद्धचे वारे जोरात होते. पण अस्पृश्यांना इंग्रजांबरोबरच अडाणीपणाच्या गुलामीनेही जखडून ठेवले होते. त्यांच्या मानगुटीवरून निरक्षरतेचे साखळदंड भिरकावून देण्यासाठी शेवटी ‘विठ्ठल’ पावला.
ठळक मुद्देशतक महोत्सवातही उपेक्षित : महात्मा गांधी, वि.दा.सावरकर, मदन मोहन मालवीय यांच्या भेटी