१३ उमेदवार : ४८ मतदान केंद्र, मतदारांना एक दिवसाची रजा यवतमाळ : येत्या ३ फेब्रुवारी रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. यासाठी ४८ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. मतदानासाठी सरकारी सुटी देण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत. १३ उमेदवार रिंगणात असून मतमोजणी ६ फेबु्रवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील ३३ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्ह्यातील ४८ मतदान केंद्रापैकी सर्वाधिक १४ केंद्र यवतमाळ शहरात राहणार आहे. नेर येथे २, बाभूळगाव १, कळंब १, राळेगाव १, दारव्हा ३, दिग्रस २, आर्णी ३, घाटंजी ३, केळापूर ३, मारेगाव १, वणी ३, महागाव २, पुसद ४ आणि उमरखेडमध्ये प्रत्येकी ४ मतदान केंद्र राहणार आहेत. या केंद्रावर जम्बो मतपेटीचा वापर केला जाणार आहे. सकाळी ८ ते ४ पर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी ६ फेब्रुवारीला अमरावती येथे होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी २१४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३ फेब्रुवारीला मतदान करता यावे म्हणून शासकीय कर्मचाऱ्यांना नैमित्तीक रजा देण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. खासगी कर्मचाऱ्यांना दोन ते तीन तासांची रजा देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. (शहर वार्ताहर) असे आहेत उमेदवार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १३ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये डॉ. रणजित पाटील, संजय खोडके, दिलीप सुरोसे, नीता गहरवाल, अॅड. अरुण आंबेडकर, डॉ. अविनाश चौधरी, गणेश तायडे, अॅड. गावंडे, संतोष नारायण, जितेंद्र जैन, प्रा. डॉ. दीपक धोटे, अॅड. लतिश देशमुख, प्रशांत काटे, प्रा. प्रशांत वानखडे यांचा समावेश आहे.
‘पदवीधर’साठी उद्या मतदान
By admin | Published: February 02, 2017 12:18 AM