शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

वावरात मजुरी, घरात गरिबी, अंगात आजार तरी 'तिच्या' गळ्यात गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:20 AM

‘अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं..’ तुम्हाला वाटते एखादी लब्ध प्रतिष्ठित घरातली तरुणी गात असावी. तुम्ही वळून बघता अन् कळते ही तर सत्तर वर्षांची आजी गातेय!

ठळक मुद्देयवतमाळ जिल्ह्यातील हरफनमौलासत्तरीच्या संघर्षात मुरलेला सदाबहार स्वर

अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ‘कोई लडका है जब वो गाता हैं... सावन आता हैं छनक छनक छुमछुम..’ हे या गाण्यावर नाचत असते माधुरी दीक्षित. भाबड्या रसिकांना वाटते ही अल्लड तरुणीच गातेय. पण प्रत्यक्षात स्वर असतात ९० वर्षांच्या लता मंगेशकरांचे. अगदी तशीची अवस्था होते हरसूल नावाच्या छोट्याशा खेड्यात पाहोचल्यावर. तुमच्या कानी सूर धडक देतात, ‘अजनबी कौन हो तुम जबसे तुम्हे देखा हैं..’ तुम्हाला वाटते एखादी लब्ध प्रतिष्ठित घरातली तरुणी गात असावी. तुम्ही वळून बघता अन् कळते ही तर सत्तर वर्षांची आजी गातेय! ती कधीही शाळेत न गेलेली, दररोज वावरात काबाडकष्ट उपसून रात्री स्वत:च चूल पेटविणारी... ही अवस्था ऐकल्यावर तर तुम्ही तिच्या आवाजाचे चाहते नव्हे भक्त बनता.खेड्यातल्या रोजमजुरी करणाऱ्या बाया जशा दिसतात, तशीच जिजाबाईदेखील थकलेल्या, रापलेल्या चेहºयाने भणंग जीवनाची हिस्सेदार. तिचीही जिंदगी कफल्लक. पण गळा जिंदादिल. काया सत्तरीच्या पलिकडे पोहोचलेली, पण कंठ आजही सोळाव्या वर्षात. ‘जिंदगी प्यार का गीत है’पासून तर ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नही’पर्यंत सारीच गाणी ती अशा काही वकुबाने गाते, की सारे गाव तिला आपुलकीने लता मंगेशकर म्हणते!जीजाबाई भगत हे या गायिकेचे नाव. हरसुल (ता. दिग्रस) हे गाव म्हणजे तिची दुनिया अन् छोटीशी झोपडी हाच तिचा महाल. खेड्यातल्या महिलांनी आरत्या, व्रत-वैकल्याच्या निमित्ताने गायनकला जोपासलेलीच असते. पण ती भक्ती फक्त देवाची असते. त्यात गाणे नसते. जीजाबाईसाठी मात्र स्वर हाच देव असतो. अन् गाणे हीच पूजा असते. तिच्या नावामागे कोणत्याच सांगितिक घराण्याचे बिरुद नाही. शास्त्रीय, उपशास्त्रीय अशा चौकटीतही तिचे गाणे अडकत नाही. गावातल्या अरुणावती नदीच्या प्रवाहासारखीच तिचे स्वर मुक्त वाहतात. प्रत्येकाला तृप्त करतात.बालपणापासून सुरांची साधना करता-करता अन् घरातल्या गरिबीशी लढता-लढता तिने लग्नच केले नाही. आज वृद्धत्वाचे आजार भोगतानाही ती एकटीच असते. छोटेसे घर. वृद्धत्वाने जर्जर झालेला भाऊ, मजुरी करणारा भाचा एवढाच तिचा गोतावळा. ती स्वत: दररोज सकाळीच वावरात जाते. शनिवारीही ती सकाळी १० वाजताच शिवारात निघून गेली. पण जातानाही तिच्या ओठी गाणेच होते.. आदमी मुसाफीर हैं आता हैं जाता हैं..!

स्वातंत्र्यदिनाची सेलिब्रिटी!जीजाबाईने कुठेही संगीताचे शास्त्रोक्त धडे गिरविले नाही. कधी शाळेत जाऊन अबकड शिकली नाही. पण गेल्या ५०-६० वर्षातील हिंदी सिनेगीतं तिला मुखोद्गत आहेत. हरसुलसारख्या गावात गाण्याचा ‘परफॉर्मन्स’ देण्याची एकमेव संधी म्हणजे, जिल्हा परिषद शाळेत होणारा १५ ऑगस्ट, २६ जानेवारीचा कार्यक्रम. दरवर्षी जीजाबाईला या कार्यक्रमात खास निमंत्रण असते. अन् तेथे गेल्यावर खास फर्माईश असते ती ‘ऐ मेरे वतन के लोगो’ची. लतादिदींच्या ताकदीने ती गाते अन् साऱ्यांच्या डोळ्यात अश्रूही आणते.

टॅग्स :musicसंगीत