ठळक मुद्देअनोखे रक्षाबंधन : विविध सामाजिक संघटनांचा उपक्रम
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कळतन्कळत घडलेल्या गुन्ह्यांची शिक्षा भोगणाऱ्या कारागृहातील बंदी बांधवांना राखी बांधण्यासाठी रविवारी बहिणी पोहोचल्या. या बहिणींनी रक्षणाची ओवाळणी मागितली.जिल्हा कारागृहात ३५० बंदी बांधव आहे. सामाजिक संघटनांनी बंदी बांधवांना राखी बांधण्यासाठी पुढाकार घेतला. गुरूदेव सेवा मंडळ, कामगार कल्याण मंडळ, योग समिती आणि आर्ट आॅफ लिव्हींगच्या वतीने रक्षाबंधनाचे आणि योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामगार कल्याण मंडळाचे केंद्रप्रमुख गजानन सोनटक्के, तुरूंग अधीक्षक देवराव आडे, तुरूंग अधिकारी शरद माळशिखरे, अनिकेत गोरवाडकर, सोहेल शेख, रक्षक भारती बोरसरे आदी उपस्थित होते.