शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार ढेपाळला

By admin | Published: July 12, 2014 1:49 AM

शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. येथील एकही विकास काम पूर्ण झाले नाही...

यवतमाळ : शहरालगतच्या वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला आहे. येथील एकही विकास काम पूर्ण झाले नाही. नागरिकांना मूलभूत सुविधाही पुरविण्यात ग्रामपंचायत अयशस्वी ठरत असल्याचे दिसून येते. ग्रामसेवक व कर्मचारीच उपस्थित राहत नसल्याने येथे कोणावरच नियंत्रण नाही. वाघापूर ग्रामपंचायतीला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. शहरालगत असलेला हा परिसर दुर्लक्षित असल्याचे दिसून येते. या ग्रामपंचायतीमध्ये नव्याने उदयास आलेल्या आठवलेनगर, प्रियंकानगर, विलास नगर, वाघाईनगरी येथील लेआऊटमध्ये कोणत्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाही. रस्ते, नाल्या नसल्याने पावसाळ्यात वाहने घरापासून दूर ठेवून चिखल तुडवित जावे लागते. ग्रामपंचायतीचे याकडे लक्ष नाही. ग्रामपंचायत कार्यालयात सहा लिपीकवर्गीय कर्मचारी आहेत. मात्र कार्यालयीन वेळेतही यापैकी एकही जण उपस्थित राहत नाही. ग्रामसेवकाला तर कार्यालयाची अ‍ॅलर्जी असल्याचेच दिसते. तक्रारी घेऊन येणाऱ्या नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकूण घेण्यासाठीही कुणीच राहत नाही. घंटागाडीवर कचरा गोळा करण्यासाठी नेमलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर ग्रामपंचायत कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. प्रचंड अनागोंदी असल्यामुळेच गेली पाच वर्षात ग्रामसभेने घेतलेल्या एकाही ठरावाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच झाली नाही. घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीला वित्त आयोगातून १५ लाख रुपये मिळाले. प्रत्यक्षात मात्र घनकचरा व्यवस्थापनाची कुठलीच सुविधा ग्रामपंचायतीजवळ नाही. हा निधी खर्च न झाल्यामुळे परत गेला आहे. गावात सर्वत्र घाण साचल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे. हागणदारी मुक्तीसाठी सार्वजनिक शौचालय बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी दोन लाख रुपये मिळाले. दोन वर्षांपासून या शौचालयाचे काम रखडलेले आहे. मिळालेल्या निधीपैकी किती रक्कम खर्च झाली, याचा हिशेबही देण्यास कुणीच तयार नाही. गावाच्या सौंदर्यीकरणासाठी आलेले १५ लाख रुपयेही अखर्चित आहेत. हा पैसा सुद्धा घनकचऱ्याच्या निधीप्रमाणे परत जाण्याची शक्यता आहे. पावसाळा सुरू झाला तरी प्रत्यक्ष उपाययोजना मात्र करण्यात आलेली नाही. नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. याबाबत दरवर्षीच तक्रारी होतात. पाऊस आल्यानंतर अनेकांची तारांबळ होते. परंतु खबरदारी म्हणून कुठलीही उपाययोजना ग्रामपंचायतीकडून केली जात नाही. घन कचऱ्यासाठी विशिष्ट जागा निश्चित केली नसल्यामुळे स्मशानभूमीच्या परिसरातच कचरा टाकला जात आहे. अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आल्यानंंतर तेथे उभे राहण्याची सोय राहिली नाही. स्मशानभूमीलाच कचरा डेपोचे स्वरुप आले आहे. ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये खर्च करून रोपवाटिका तयार केली होती. प्रत्यक्षात कुठलेही काम या रोपवाटिकेचे झाले नाही. हा निधी कागदोपत्रीच रोपवाटिका दाखवून हडपल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. एकंदरच वाघापूर ग्रामपंचायतीचा कारभार पूर्णत: ढेपाळला असून यासाठी दोषी ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)