हमीभावाने घोर निराशा : कापसाला केवळ ५० रूपये दरवाढ, मूग, उडीद आणि तुरीला २०० रूपये बोनस जाहीर रूपेश उत्तरवार यवतमाळ केंद्र शासनाने कापसाला हमी भावात केवळ ५० रुपये वाढ दिल्याने शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. या शेतकऱ्यांना आता राज्य शासनाकडून प्रति क्ंिवटल किमान एक हजार रुपये बोनस कापसावर मिळावा, अशी अपेक्षा आहे. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्ंिवटल एक हजार रुपये बोनस द्यावा, अशी शिफारस भाजपा-शिवसेना युती सरकारकडे केली आहे. या शिफारसीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची आता प्रतीक्षा आहे. त्यातही कापूस शेतकऱ्याच्या घरात येण्यापूर्वी हा बोनस जाहीर करावा, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांनी काँग्रेसचे सरकार झुगारुन मोठ्या अपेक्षेने नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता दिली. ते तरी शेतकऱ्यांना योग्य हमी भाव देऊन न्याय देतील, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच वर्षी त्यांनी अपेक्षा भंग केला. कापसाला केवळ ५० रुपये हमी भाव वाढविण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी कापसाचे शासकीय दर अधिकाधिक चार हजार १०० रुपये प्रति क्ंिवटल एवढे राहणार आहे. या वाढीव हमी दराने शेतकऱ्यांची घोर निराशा केल्यानेच त्यांच्या नजरा आता बोनसवर लागल्या आहेत. शासनाने हमीभाव जाहीर केले आहे. डाळवर्गीय पिकांना बोनसशेतकरी कापसाला वाढीव दर अथवा बोनस मागत आहे. प्रत्यक्षात डाळवर्गीय पिकांना यावर्षी बोनस जाहीर करण्यात आले आहे. हा बोनस अथवा वाढीव दर कापसाला मिळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीच सूर आहे. मूग ४६५० रुपये, उडीद ४४२५ रुपये आणि तूर ४४२५ रुपये क्विंटलचा आधारभूत दर जाहीर करण्यात आला आहे. या डाळवर्गीय पिकांच्या आधारभूत किमतीवर २०० रूपयांचे बोनस जाहीर करण्यात आले आहे.तर काळे सोयाबीन आणि पिवळ्या सोयाबीनचा दर २६०० क्विंटलचा आधारभूत दर घोषित करण्यात आला आहे. भूईमुगाचा दर ४०३० रुपये क्विंटल आहे. सूर्यफूल ३८०० रुपये क्विंटल, तिळ ४७०० रुपये क्विंटल, कराळ ३६५० रुपये प्रती क्विंटलचे आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाला आता प्रतीक्षा बोनसची
By admin | Published: September 17, 2015 3:10 AM