यवतमाळ : जिल्हा पोलीस दलाच्या शिपाई भरतीतील ५४ उमेदवारांना अद्याप प्रत्यक्ष नियुक्ती आदेश न मिळाल्याने हे ग्रामीण उमेदवार अस्वस्थ आहेत. पोलीस शिपाई पदासाठी चार महिन्यांपूर्वी भरतीप्रक्रिया राबविली गेली होती. हजारो उमेदवारांनी या भरतीत धडक दिली. शारीरिक क्षमता चाचणी आणि लेखी परीक्षेअंती ५४ उमेदवार पात्र ठरले. यातील बहुतांश उमेदवारांची चारित्र्य तपासणी आणि वैद्यकीय तपासणीसह अन्य प्रक्रियाही पार पडली. परंतु अद्याप गेल्या दीड महिन्यांपासून त्यांना नियुक्ती आदेश दिले गेले नाहीत. आम्ही ग्रामीण उमेदवार असून आधीच आर्थिक अडचणीत असल्याने आम्हाला तातडीने नियुक्ती आदेश मिळावे, अशी या पोलीस होऊ इच्छिणाऱ्या युवकांची भावना आहे. नागपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये नव्या पोलीस भरतीमधील उमेदवार एक ते दीड महिन्यांपूर्वीच नियुक्ती आदेश घेऊन पोलीस दलात रुजूही झाले आहेत. परंतु यवतमाळच्या उमेदवारांना अद्याप नियुक्ती आदेशाची प्रतीक्षाच आहे. (जिल्हा प्रतिनिधी) पोलीस भरतीत १३ पदे वाढली. प्रतीक्षा यादीतून ती घेतली गेली. या प्रक्रियेला विलंंब झाला. या पैकी ३२ उमेदवारांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. इतरांचे प्राप्त होताच नियुक्ती आदेश दिले जातील. एकूण ५४ जागांची ही भरती होती. त्यातील चार जागा अनुकंपाच्या होत्या. - संजय पुज्जलवारप्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) यवतमाळ.
पोलीस भरतीतील उमेदवारांना नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा
By admin | Published: August 27, 2016 12:52 AM