लोकमत न्यूज नेटवर्ककळंब : कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्यात आले नाही. प्रवासी निवारे चुकीचे बसविण्यात आले या व इतर प्रश्नांसाठी कळंब तालुका विकास आघाडीच्यावतीने उमरी गावाजवळ सोमवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आले.प्रवासी निवाऱ्यात पाणी आणि उन्हापासूनही संरक्षण होेत नाही. त्यातल्या त्यात केवळ चार लोकांना बसण्याची व्यवस्था केली. शेतातील रस्ते अजूनही सुरळीत करण्यात आले नाही. आमला, उमरी, कात्री आदी रस्त्यावर हायमास्ट लाईट लावण्याचे मान्य करुनही लावण्यात आले नाही. त्यामुळे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक काही तास बंद होती. आमदार डॉ.अशोक उईके, तहसीलदार सुनील पाटील, ठाणेदार नरेश रणधीर तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संबंधित रस्ता बांधकाम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली बाजू मांडली.या मोर्चाचे नेतृत्व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रवीण देशमुख यांनी केले. आंदोलनात मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबू पाटील वानखडे, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप, पंचायत समिती सदस्य स्वाती दरणे, माजी पंचायत समिती सभापती शशिकांत देशमुख, पणन महामंडळाचे संचालक सुरेश चिंचोळकर, माटेगावचे सरपंच किशोर जगताप, कात्रीचे सरपंच पुरुषोत्तम आगलावे, उमरीचे सरपंच जनार्धन रोकडे, खुशाल रोकडे, बंडू येंगडे, प्रवीण दिघडे, तिलोत्तमा मडावी आदी सहभागी झाले होते.
कळंब-राळेगाव मार्गावर चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 9:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्क कळंब : कळंब-राळेगाव-वडकी सिमेंट रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. परंतु अजूनही शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे करण्यात आले नाही. ...
ठळक मुद्देउमरीजवळ वाहतूक ठप्प : विकास आघाडीचा पुढाकार, रस्त्यामुळे निर्माण झालेल्या समस्या