शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

वणी नगर परिषदेला मिळणार एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 10:23 PM

वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

ठळक मुद्देटोलनाक्याचे अनधिकृत बांधकाम : बांधकाम विभागाचे कंपनीला आदेश

म.आसिफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी ते घुग्गूस मार्गावर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे टोल प्लाझाचे बांधकाम केले होते. यासंदर्भात नगरसेवक पी.के. टोंगे यांनी बांधकाम मंत्रालय व बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत नगरपरिषदेला एक कोटी रूपये विकास शुल्क देण्याचे आदेश बांधकाम विभागाने टोल कंपनीला दिले आहे.वणी ते घुग्गूस मार्गावर काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. या रस्त्याच्या वसुलीसाठी आयव्हीआरसीएल कंपनीचा टोल प्लाझा वणीत तयार करण्यात आला आहे. जवळपास २५ वर्ष या टोलनाक्याद्वारे वाहनचालकांकडून वसुली केली जाणार आहे. मात्र या टोलनाक्याची उभारणी करताना सदर आयव्हीआरसीएल कंपनीने नगरपरिषदेची कोणतीही परवानगी घेतली नाही. विकास शुल्क न भरता मनमानी पद्धतीने या कंपनीने दोन वर्षापूर्वी टोलनाका उभारला. याप्रकरणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पी.के.टोंगे यांनी गेल्यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभाग व बांधकाम मंत्रालयाकडे तक्रार केली होती. या कंपनीमुळे नगरपरिषदेचे एक कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.यावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने या कंपनीला २० डिसेंबर २०१८ च्या तक्रारीवरून नोटीस बजावली आहे. नगरपरिषदेची परवानगी न घेता विकास शुल्कही भरले नाही व नगरपरिषदेच्या हद्दीत एमआयडीसी असतानाही त्यांच्याकडूनही टोल वसुली केली जात आहे. तसेच पथकर नाक्याच्या बांधकामाकरिता कंपनीने परवानगी घेतली नसल्याचा आरोप २६ सप्टेंबर २०१८ रोजी केलेल्या तक्रारीतून केला होता. याबाबत नगरपरिषदेनेही दोनदा पत्र देऊन आयव्हीआरसीएल कंपनीला नाका बांधकामाच्या परवानगीसाठी कागदपत्रे सादर करण्याचे सूचविले होते. मात्र कंपनीने मनमानी पद्धतीने नगरपरिषदेला कागदपत्रे पुरविण्याचे औचित्य दाखविले नाही.कंपनीच्या या अडेलतट्टू धोरणामुळे मात्र नगरपरिषदेचे मोठे नुकसान झाले होते. बांधकाम परवानगी विकास शुल्क व मालमत्ता कर, असे एकुण एक कोटी रूपयांचे नगरपरिषदेचे नुकसान झाल्याचे बांधकाम विभागाने कळविले आहे. याबाबत आयव्हीआरसीएल कंपनीला नोटीस बजावून तीन दिवसाच्या आत अहवाल मागितला आहे. जर अहवाल पाठवला नाही, तर नियमानुसार कारवाई करण्यात येईल तसेच नगरपरिषदेच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची वसुली कंपनीच्या देयकातून करण्यात येईल, असे आदेश पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहे. त्यामुळे आता नगरपरिषदेला कर स्वरूपात एक कोटी रूपये मिळण्याची शक्यता आहे. याबाबत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांना विचारणा केली असता, त्यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :tollplazaटोलनाका