लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते, हे विशेष. सध्या वसंत ऋतूची चाहुल लागली असून दिवसाच्या तापमानातही वाढ होत आहे.‘आला शिशिर संपत, पाने गळत चालली’ या ओवीतून कवी निसर्गाचे छान विश्लेषण केले. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला, असे कोकिळा गाणे गात असते. पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षभरात सहा ऋतू येतात. प्रत्येक ऋतू वैशिष्ट्यपूर्णच. वर्षा ऋतूत पावसाच्या सरी कोसळतात. शिशिर ऋतूत थंडीचा कडाका असतो. शरद, हेमंत ऋतू व वसंत ऋतूत शुष्क वातावरणामुळे वनस्पतींना उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ९५ टक्के झाडांची पाने गळून पडतात. याचे कारणच हे की, प्रत्येक वनस्पती हवा, पाणी व सूर्यप्रकाशावर जगतात. शिशिर ऋतूपर्यंत झाडांना पाणी मुबलक राहत असल्याने मुळातून पानापर्यंत पाणी पोहोचते. मात्र शुष्क वातावरणात पाण्याची पातळी खालावत असल्याने झाडे मुळात पाणी साठवितात. पानांना पाण्याचा पुरवठा बंद होतो. परिणामी पान गळाली तरी झाड मात्र ओलसरच राहते.आम्रवृक्षावर परिणाम नाहीविदर्भात वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी पाच टक्के प्रजाती अशा आहेत, ज्यांची पाने वर्षभर गळत नाहीत. आम्रवृक्षाचीही पाने गळतात. मात्र एकाचवेळी पूर्णत: गळत नसल्याने दिसून पडत नाही. कारण त्याची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर गेलेल्या असतात. फांद्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने एकाच वेळी पूर्णत: पानगळ होत नसल्याची माहिती प्रा.डॉ.केतन हटवारे यांनी दिली.
पर्णगळतीने झाले उन्हाळ्याचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 10:17 PM
पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते.
ठळक मुद्देवसंताची चाहूल : ऋतूमानात होतोयं बदल, दिवसाच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ