नदीकाठावर पुसद, उमरखेड, महागाव, हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट या तालुक्यांतील अनेक गावे आहे. सध्या धरण जलाशयाची पातळी ४३९.७२ मीटर झाली आहे. जिवंत साठा ८४५.१८ दलघमी आहे. जलाशयाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. १५ सप्टेंबरपर्यंत पाणी पातळी ९८.५१ टक्के ठेवावी लागणार आहे. धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने वक्रव्दाराद्वारे कोणत्याही क्षणी अतिरिक्त पाणी पैनगंगा नदीत सोडावे लागणार आहे. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुराच्या पाण्यामुळे जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून पैनगंगा नदीकाठच्या दोन्ही तीरांवरील गावातील नगरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यांनी आपली गुरेढोरे, घरगुती व शेती उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी ठेवणे व नगरिकांनी सुरक्षितस्थळी राहण्याबाबत तहसीलदारांनी सूचना द्यावी, असे पूरनियंत्रण अधिकारी तथा उपविभागीय अभियंता एच.एस. धुळगंडे यांनी कळविले आहे. त्यानुसार तहसीलदार आनंद देऊळगावकर यांनी उमरखेड तालुक्यातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.