लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : महाराष्ट्राचा महागायक सारेगमपचा उपविजेता ठरलेला येथील उज्वल गजभार दिग्रस शहरात पोहोचताच मानोरा चौकात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.एका खाजगी वाहिनीच्या सारेगमप या गायनाच्या स्पर्धेत उज्वल उपविजेता ठरला. दिग्रसच्या मानात तूरा खोवला. उपविजेता ठरल्यानंतर उज्वलते दिग्रस शहरात मंगळवारी आगमण झाले. त्याच्या स्वागतासाठी नागरिकांनी मानोरा चौकात एकच गर्दी केली होती. मानोरा चौकात नगराध्यक्ष सदफजहाँ मो. जावेद, राहूल शिंदे, संजय कुकडी, नगर परिषद उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे, बांधकाम सभापती बाळू जाधव, नगरसेवक केतन रत्नपारखी, पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर कांबळे, यशवंत सुर्वे, सैयद मोहसिन, ऋषिकेश हिरास, रमाकांत काळे, अजय भोयर, धर्मराज गायकवाड, महेंद्र मानकर, मिलींद मानकर, यादव गावंडे यांनी स्वागत केले.काँग्रेसतर्फे सत्कारउज्वल गजभार या महागायकाचा काँग्रेस कमेटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, राजा चौहाण, विजय घाटे, इस्तयाक सैयद, कैसल पटेल, मजहर शेका, मोनू मकतेदार, ताबीश शेका, सोहेल खान, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.
महागायक उज्वलचे दिग्रसमध्ये जंगी स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:33 PM
लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : महाराष्ट्राचा महागायक सारेगमपचा उपविजेता ठरलेला येथील उज्वल गजभार दिग्रस शहरात पोहोचताच मानोरा चौकात त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. पारंपारिक वाद्याच्या गजरात त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आली.एका खाजगी वाहिनीच्या सारेगमप या गायनाच्या स्पर्धेत उज्वल उपविजेता ठरला. दिग्रसच्या मानात तूरा खोवला. उपविजेता ठरल्यानंतर उज्वलते दिग्रस शहरात मंगळवारी आगमण ...
ठळक मुद्देनागरिकांची तोबा गर्दी : शहरातून काढली मिरवणूक