शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

पाण्यासाठी...अडला नारायण धरी टँकरवाल्यांचे पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 9:35 PM

पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत.

ठळक मुद्देटँकर चालकांची मनमानी : नियम मोडत असूनही ३५ हजार व्याकूळ लोक हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शासनाकडे टँकर उपलब्ध होणे शक्य नसल्याने खासगी ठेकेदारांमार्फत हे टँकर चालविले जातात. मात्र ‘लोकमत’चमूने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये या टँकर मालक-चालकांची मनमानी उघड झाली. टँकरवाले सर्रास नियम मोडून पुढे जात आहेत. गावकऱ्यांना ही बाब माहीत आहे. तरीही ड्रमभर नको पण निदान बकेटभर तरी पाणी मिळते, या आशेपायी ते टँकर चालकांच्या नियमबाह्य वर्तनाबाबत गप्प आहेत. अडला नारायण धरी गाढवाचे पाय, अशी गावकऱ्यांची अवस्था आहे. जिल्हा प्रशासनाची यंत्रणाही प्रचंड गाफिल आहे. टँकरची फेरी कुठे सुरू आहे, कोठून पाणी भरले, कोणत्या गावात वाटप केले, हे कळण्यासाठी वाहनावर जीपीएस यंत्र बसविणे बंधनकारक आहे. मात्र ‘लोकमत’च्या पाहणीत अनेक टँकरवर जीपीएस यंत्र आढळले नाही. काही टँकरवर हे यंत्र असले तरी ते कार्यान्वित नाही. त्यामुळे प्रशासनच जाणीवपूर्वक टँकरकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. यात टँकर चालक आणि प्रशासनातील कर्मचाºयांचेही साटेलोटे असण्याची शक्यता आहे. टँकर शासकीय आहे की खासगी हे कळण्यासाठी टँकरवर बॅनर लावणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात कोणत्याही टँकरवर बॅनरचा पत्ता नाही.सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या गावात पाणी वाटपाची जबाबदारी टँकर चालकाला दिली गेली आहे, त्या गावातील नामनिर्देशित महिलांची स्वाक्षरी दररोज लॉगबुकवर घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश गावांमधील टँकर चालकांकडे असलेले लॉगबुक कोरे करकरीत आढळले. गावातील महिलांना विचारले असता कधीच आमच्या सह्या घेतल्या जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व परिस्थितीवरुन शासकीय टँकरच्या नावाखाली काही गावांमध्ये पाण्याचा धंदा सुरू असण्याची भीती आहे. गावकऱ्यांच्या अडचणीचा गैरफायदा घेतला जात आहे.या गावांची तहान टँकरवरचयवतमाळ - पांढरी, इचोरी, किटा, आर्णी - सुधाकरनगर, नेर - खरडगाव, आजंती, घुई, बाभूळगाव - फत्तेपूर, सारफळी, दारव्हा - भांडेगाव, करजगाव, पुसद - बाळवाडी, पन्हाळा, मारवाडी, लोहरा खुर्द., म्हैसमाळ, वडसद, बुटी ई., सावरगाव बंगला, लोहरा ई., महागाव - फुलसावंगी, घाटंजी - चांदापूर, निंबर्डा.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई