रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.यवतमाळात यावर्षी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. यावर मात करण्यासाठी नगरपरिषदेने टँकर सुरू केले. तरीही नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी पालिकेकडे येत आहे. शहरात २८ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात दोन टँकर पाठविण्यात येतात. एका टँकरला दररोज सहा फेºया मारायच्या असतात. यात दोन टँकरच्या एका प्रभागात १२ फेºया होतात. पाणी वितरणासाठी टँकर मालकाला दररोज प्रत्येकी दोन हजार ४५० रूपये देण्याचा करार झाला आहे. त्यानुसार ६४ टँकरने पाणी वितरणासाठी पालिकेला दररोज एक लाख ५६ हजार ८०० रूपये मोजावे लागतात.पाणी उपलब्ध करण्यासाठी ७९ सार्वजनिक विहिरींमधील गाळ काढण्यात आला. त्यासाठी तब्बल ६९ लाखांचा खर्च झाला. या विहिरींवरून टँकर पाणी भरतात. सोबतच गोखी प्रकल्पावरूनही पाणी घेतले जाते. शहरातील विहिरी आणि गोखीतील पाणी भरून ते प्रभागात वाटले जाते. यात दिवसभरात सर्व टँकरच्या ३८४ फेºया होतात. या ३८४ फेºयांव्दारे दररोज ११ लाख ५२ हजार लिटर पाणी वितरित केले जाते. एवढे मुबलक पाणी वाटप होऊनही गरजवंतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी येत आहेत.या तक्रारींचे वास्तव जाणून घेण्यासाठी आता मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी २८ प्रभागांचे चार झोन पाडून पाणी वितरणाच्या चौकशीचे आदेश दिले. चार अभियंत्यांना पाणी वाटप व्यवस्थित होती काही, याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. यात प्रत्येक अभियंत्याकडे सात प्रभागांची चौकशी सोपविण्यात आली. त्यांच्या सोबतीला पाच आरोग्य निरीक्षक आणि २८ वॉर्ड शिपाई नियुक्त करण्यात आले आहे.आता पाणी वाटपाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीत प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोहोचते काय, कुठल्या भागात पाणी मिळाले आणि कुठल्या भागात पाणीच मिळाले नाही, त्याची कारणे काय, टँकरच्या खरोखर किती फेºया होतात, पाणी शुद्ध होते काय, याची तपासणी केली जात आहे. ज्या विहिरींचा गाळ उपसा करण्यात आला, त्या विहिरींची सध्याची स्थिती काय, पाणी खोल गेले काय, विहिरीतील गाळ खरच उपसला गेला का, यासह अनेक विषयाची माहिती चौकशी चमू गोळा करीत आहे. चौकशी झाल्यानंतर मुख्याधिकाºयांना अहवाल सोपविला जाणार आहे.अशा आहेत गंभीर तक्रारीविहीर अधिग्रहित करण्यापूर्वी पाण्याचे बिल काढण्यात आले. विहिरी स्वच्छ न करताच काहींना देयक देण्यात आले. काही विहिरींचा तर गाळही काढण्यात आला नाही. विहिरीतील मोटरपंप परस्पर बदलवले जातात. काही भागात टँकर पोहोचतच नाही. पाणी वाटपाच्या रजिस्टरवर तशा नोंदीही नाही. पिंपळगाव प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना पाणीच मिळाले नाही. झोपडपट्टीला वगळण्यात आले. या संदर्भात अभियंता उके यांनी पाहणी केली. त्यांना पाणी वाटप झाले नसल्याचे निदर्शनास आले. अद्यापही या भागात टँकर पोहोचत नाही. त्यामुळे या भागातील नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत. आता चौकशीअंती कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.पाण्याचा खर्च६४ टँकर, दररोज प्रती टँकर २४५० रूपये२५ सबमर्शिबल पंप, २००० रूपये प्रती दिवस७९ विहिरींची स्वच्छता, ६९ लाखांचा खर्चफ्लोटिंगपंप १४ लाख रुपयांचा खर्चगोखीतून पाणी उचलण्यासाठी सहा लाख ४८ हजारपाच लाख महावितरणकडे अनामत ठेवलोडींगसाठी एक लाख ९७ हजार भरलेप्रशासनाने पाणी वाटपाची आणि विहिरींच्या जलस्त्रोताची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अहवालानुसार कारवाई होईल.- अनिल अढागळेमुख्याधिकारी, न.प. यवतमाळ
पाणी वाटपाची चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:28 PM
शहरात पाणी वितरणासाठी नगरपरिषदेने ६४ टँकर सुरू केले. त्यासाठी पालिकेला दररोज लाखो रूपये मोजावे लागत आहे. तरीही गरजवंतापर्यंत पाणी पोहोचत नाही. या प्रकाराची गंभीर दखल घेत मुख्याधिकाऱ्यांनी पाणी वाटपाच्या चौकशीचे आदेश दिले.
ठळक मुद्देगैरवापराविरूद्ध बडगा : गरजवंतापर्यंत टँकर पोहोचलेच नाही