लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले. मात्र म्हसनी व इतर प्रकल्पातील पाणी सोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी मंगळवारी तातडीची बैठक घेतली. या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश दिले. यामुळे टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे.बेंबळा प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली. यामुळे या भागातील नागरिकांनी कॅनलमध्ये पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार बेंबळा प्रकल्पातून एक दलघमी पाणीसाठा सोडण्यात आला. दारव्हा शहराकरिता कुंभारकिन्ही प्रकल्पातून ०.२० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. अडाण प्रकल्पातील २८ गावांनी मसनी धरणातील पाणी सोडण्याची मागणी केली होती. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील टंचाई नियंत्रण कक्षाचा अहवाल येणे बाकी आहे. यानंतर या गावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे.प्रकल्पातील जलसाठ्यात घटउन्हाच्या दाहकतेने जल प्रकल्पातील साठ्यात आणखी घट झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्रकल्पांनीही तळ गाठला आहे. पुढील काही दिवसांत ही स्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.
बेंबळा, कुंभारकिन्हीचे पाणी अखेर नदीत सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:58 PM
जिल्ह्यातील पाणी टंचाई तीव्र होत आहे. यावर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. त्यानुसार बेंबळा व कुंभारकिन्ही धरणातील पाणी नदीत सोडण्यात आले.
ठळक मुद्देम्हसनीला प्रतीक्षाच : टंचाई निवारणासाठी उपायांचे आदेश