लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : तालुक्यातील मांजरजवळा, कन्हेरवाडी ते बेलोरा मार्गावरील शेतशिवारात नालीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली खोदली. त्यामुळे पाणी साठत असून ते शेतात शिरत आहे. सदर नाली दुरूस्त करून साठवलेले पाणी काढून टाकण्याची मागणी मांजरजवळा शेतकऱ्यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले. त्यातून नाली दुरुस्तीची मागणी केली. अन्यथा येत्या १४ आॅगस्टपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुसद येथील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला. तालुक्यातील मांजरजवळा, कन्हेरवाडी ते बेलोरा या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठी नाली खोदली. मात्र ती नाली अपूर्ण असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साठत असून ते पाणी शेतात शिरून पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत पुसद येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयात अनेकदा शेतकऱ्यांनी लेखी व तोंडी विनंती केली. मात्र अधिकाºयांनी लक्ष दिले नाही. या शेतकऱ्यांकडे शेती व्यतिरिक्त अन्य उत्पन्नाचे साधन नाही. यंदाही पिकांचे नुकसान झाल्यास मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नाली दुरुस्तीच्या मागणीकडे त्वरित लक्ष देऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने नालीत साठलेले पाणी काढून टाकावे. अन्यथा येत्या १४ आॅगस्टपासून आमरण उपोषषणाचा इशारा सीताराम लुंगे, शालीक कांबळे, भीमराव चव्हाण, सुधाकर चव्हाण, बिरचंद चव्हाण, मारोती लुंगे आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिला.
मांजरजवळा शेतशिवारात पाणी शिरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 10:35 PM
तालुक्यातील मांजरजवळा, कन्हेरवाडी ते बेलोरा मार्गावरील शेतशिवारात नालीचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात शेतजमिनीचे व पिकांचे नुकसान होत आहे. या रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभागाने नाली खोदली. त्यामुळे पाणी साठत असून ते शेतात शिरत आहे.
ठळक मुद्देरस्त्यालगत खोदली नाली : बांधकाम विभागाचा शेतकऱ्यांना फटका, १४ आॅगस्टपासून उपोषण